अमरावती - आंतरजातीय विवाह करून पती सोबत संसार थाटणार्या मुलीला तिच्या कुटुंबियांनी चक्क तिच्या घरात येऊन तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना ( Inter Caste Marriage in Amravati ) घडली आहे. मोशी तालुक्यातील अंबाडा गावात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मोर्शी तालुक्यात खळबळ ( Inter Caste Marriage Incident Amravati ) उडाली आहे.
28 एप्रिल ला आर्य समाज मंदिरात केला होता विवाह - अंबाडा येथील प्रेमीयुगुलाने 28 एप्रिल रोजी आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले होते. या लग्नाला मुलीच्या आई-वडिलांसह सर्व नातेवाईकांचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे चिडलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी आज थेट तिचे घर गाठले आणि मुलीला चक्क घरातून फरफटत बाहेर आणले. मुलीच्या सासरच्या मंडळींनी मुलीच्या नातेवाइकांचा विरोध केला मात्र यावेळी दोन्ही कुटुंबात हाणामारी झाली. मुलीच्या नातेवाईकांनी चक्क मुलीला उचलून नेल्याच्या प्रकारामुळे अंबाडा गावात गदारोळ माजला. हा संपूर्ण प्रकार 4 मे रोजी घडला असून या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला आहे. मुलगी ही कुणबी पाटील समाजाची तर मुलगा हा माळी समाजाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
मोर्शी पोलिस ठाण्यात तक्रार - आमच्या सुनेला घरातून उचलून नेणाऱ्या तिच्या नातेवाईकांना विरोधात मुलीच्या सासरच्यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र या तक्रारीची दखल अद्यापही पोलिसांनी घेतली नसल्यामुळे सासरच्या मंडळींनी पोलिसांच्या भूमिकेबाबत रोष व्यक्त केला आहे.