अमरावती - धामणगाव रेल्वे परिसरात ६ जानेवारीला भर दिवसा एका माथेफीरूने महाविद्यालयीन तरुणीची हत्ाय केली होती. या हत्याकांडा पूर्वी दत्तपूरचे ठाणेदार रवींद्र सोनवणे हे पीडित तरुणीशी वारंवार बोलत असल्याच धक्कादायक आरोप पिडीतेच्या आईवडीलांनी केला आहे. यानंतर बुधवारी ठाणेदार सोनवणे यांची उचलबांगडी करण्यात आली होती. शुक्रवारी या ठाणेदाराचे निलंबन करण्यात आल्याची माहिती पालमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
या हत्याकांडात रवींद्र सोनवणे या ठाणेदारालाही सह आरोपी करा अशी मागणी अमरावतीच्या पालकमंत्र्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे यांच्याकडे केली आहे.