ETV Bharat / state

Ravi Rana On Navneet Rana : खासदार नवनीत राणा अपक्ष निवडणूक लढवणार, मोदी-शाह यांचा पाठिंबा

अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. (Ravi Rana On Navneet Rana) (Badnera MLA Ravi Rana)

Ravi Rana On Navneet Rana
Ravi Rana On Navneet Rana
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 5:48 PM IST

आमदार, रवी राणा यांची प्रतिक्रिया

अमरावती : भारतीय जनता पक्षाचा (एनडीए) घटक पक्ष म्हणून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहोत. आता लोकसभा निवडणुकीत भाजपा घटक पक्ष म्हणून आम्हाला पाठिंबा देईल, असं बडनेराचे आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. खासदार नवनीत राणा येणारी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहेत. नवनीत राणा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिंबा देणार असल्याचं देखील आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात रक्षाबंधननिमित्तानं आयोजित कार्यक्रमात राणा बोलत होते. (Badnera MLA Ravi Rana)

चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका प्रामाणिक : खासदार नवनीत राणा यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यावर बोलताना आमदार राणा म्हणाले की, भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे यांची अत्यंत प्रामाणिक भूमिका आहे. त्या भूमिकेचा आम्ही आदर करतो. मात्र, खासदार नवनीत राणा आगामी निवडणूक अपक्ष लढणार, लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाचा विजय होईल. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होतील, असंही आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. (Ravi Rana On Navneet Rana )

आमदारांना राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी : रक्षाबंधननिमित्तानं आमदार रवी राणा यांना राजापेठ परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयात राखी बांधण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार रवी राणा यांनी म्हटलं की, मतदारसंघातील सर्व भगिनींचं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. रक्षाबंधनिमित्तानं सर्व जाती धर्माच्या भगिनी सहभागी झाल्याचा मला आनंद आहे, असंही रवी राणा यांनी म्हटलं आहे. (Rakshabandhan 2023)

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On Eknath Shinde : अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला; नीती आयोगाच्या बैठकीतील ठरावावरुन संजय राऊत यांचा संताप
  2. Sunil Raut On Offer : 'मला 100 कोटींची ऑफर, आमदार सुनील राऊतांच्या गौप्यस्फोटानं राजकारणात खळबळ
  3. INDIA meeting in Mumbai: एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेही करणार 31 ऑगस्टला डिनर डिप्लोमसी, राजकारणात कोण ठरणार वरचढ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.