ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरीत हजारो पालख्यांसह भक्त दाखल

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव मोझरी गुरुकुंज येथे साजरा होत आहे. या निमित्ताने राष्ट्रसंताना भावपूर्ण मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन गुरुदेव भक्त हजारो पालख्या घेऊन शुक्रवारी गुरुकुंजमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी या मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला योगगुरू रामदेवबाबा हे सुद्धा हजर असणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव
author img

By

Published : Oct 18, 2019, 5:36 PM IST

अमरावती - समस्त विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने राष्ट्रसंताना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो गुरुदेव भक्त हजारो पालख्या घेऊन अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झाले आहेत. उद्या (शनिवारी) दुपारी 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. या मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला योगगुरू रामदेवबाबा हे सुद्धा उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५१ वा पुण्यतिथी महोत्सव

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने हजारो भाविक मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजतापासून हृदयस्पर्शी अशा मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी भजनातून तुकडोजी महाराज यांचे विचार मांडले जातील. त्यानंतर दुपारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्त हे गुरुमाऊलींना २ मिनिटे स्तब्ध होऊन महाराजांना श्रद्धांजली वाहणार आहेत. तसेच, देशाच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपले बलिदान दिले अशा सर्व वीर जवानांना सुद्धा मौन श्रद्धांजली वाहिली जाईल.

हेही वाचा - 'ईटीव्ही भारत इम्पॅक्ट'; मतदानाच्या वेळेत घोळ झालेल्या 13 हजार मतदारांना मिळणार नवीन स्लिप

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यांचे कार्य प्रत्येकाने आचरणात आणावे या उद्देशातून मौन श्रद्धांजलीनंतर हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शिख, पारशी, जैन, इसाई आदी धर्माच्या प्रार्थनाही येथे होणार आहे. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेवर योगगुरू रामदेव बाबा आपले विचार मांडणार आहेत.

हेही वाचा - बडनेरा मतदारसंघात... 'राणा को हटाओ राणी को लाओ'च्या घोषणा!

Intro:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी गुरुकुंजात हजारो पालख्यांसह लाखो गुरुदेव भक्त दाखल.

उद्या राष्ट्रसंताना मौन श्रद्धांजली ,योगगुरू रामदेव बाबांची ही राहणार उपस्थिती
-----------------------------------------------
अमरावती अँकर
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५१ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने राष्ट्रसंताना भावपूर्ण मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातुन हजारो पालख्या घेऊन लाखो गुरुदेव भक्त हे अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज मध्ये दाखल झाले आहे. उद्या दुपारी ठीक 4 वाजून 58 मिनिटांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.या मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला योगगुरू रामदेवबाबा हे सुद्धा उपस्थित राहणार आहे..

Vo-
उद्या दुपारी तीन वाजता पासून हृदयस्पर्शी अशा मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरवात होईल.यावेळी भजनातून वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे विचार हे मांडले जातील.त्यानंतर दुपारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्त हे आपल्या गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना दोन मिनिटं स्तब्ध होऊन महाराजांना श्रद्धांजली वाहनार आहे.तसेच देशाच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपले बलिदान दिलें अशा सर्व वीर जवानांना सुद्धा मौन श्रद्धांजली वाहिली जाईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची शिकवणं दिल्याने मौन श्रद्धांजली नंतर हिंदू,मुस्लिम,बौद्ध, शिख,पारशी,जैन ,इसाई आदी धर्माच्या प्रार्थनाही येथे होणार आहे.त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेवर योगगुरू रामदेव बाबा आपले विचार मांडणार आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.