ETV Bharat / state

माणुसकीला काळिमा.. आईला सांगितल्यास विहिरीत ढकलण्याची धमकी देऊन वडिलांकडून 8 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार - अमरावातीत आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

जन्मदात्या वडिलांनीच आपल्या आठ वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार (Rape of a minor girl by a father) केल्याची माणुसकीला कलंक लावणारी घटना घडली आहे. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीतील नांदगाव पेठ पोलीस ठाण्या अंतर्गत ही घटना घडली. 'मम्मी को बतायेंगी तो कुएं मे डाल दूंगा' अशी धमकी त्या पीडितेला नराधम वडिलाने देऊन (Minor girl rape) अत्याचार केला.

Rape of a minor girl by a father
Rape of a minor girl by a father
author img

By

Published : Dec 12, 2021, 3:52 PM IST

अमरावती - जन्मदात्या वडिलांनीच आपल्या आठ वर्षीय चिमुकल्या मुलीवर अत्याचार (Rape of a minor girl by a father) केल्याची माणुसकीला कलंक लावणारी घटना घडली आहे. अमरावती पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीतील नांदगाव पेठ पोलीस ठाण्या अंतर्गत ही घटना घडली. 'मम्मी को बतायेंगी तो कुएं मे डाल दूंगा' अशी धमकी त्या पीडितेला नराधम वडिलाने देऊन अत्याचार केला. यात पोलिसांनी नराधम वडिलास ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अमरावती जिल्हा हादरला आहे.

जन्मदात्या नराधम वडिलांनीच त्याच्या ८ वर्षांच्या चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार (Minor girl rape) केल्याची घटना अमरावती शहरात घडली आहे. मुलांचा सांभाळ, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे त्यांचे आयुष्य चांगले जावे या करीता आज सर्वच आई वडील आपल्या जीवनात संघर्ष करीत असतात. मात्र आपल्या स्वतःच्या मुलीवरच वाईट नजर जाणे हीच माणुसकीला काळिमा लावणारी घटना अमरावतीत घडली. नांदगाव पेठ पोलीस स्टेशन हद्दीत अगदी शहाराच्या कोपऱ्यावर राष्ट्रीय महामार्गवरील असलेल्या गावात एका ३५ वर्षीय नराधम आरोपी वडिलाने त्याच्या ८ वर्षीय चिमुकलीला धमकी देऊन जबरदस्तीने अत्याचार केला. त्या दिवशी तिची आई कामाला गेली होती. घरात कोणी नसल्याची त्याने संधी साधून तिच्यावर (Minor girl rape) अत्याचार केला.

या किळसवाण्या घटनेनंतर तिच्या आईजवळ पीडित चिमुकलीने सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तिच्या आईने नराधम पतीविरुद्ध नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी लगेच 376, 376अ,376(2), (f)सहकलम 4 पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला ताब्यात घेतले. आरोपी नराधम हा दारूच्या आहारी गेला होता, अशी सूत्राकडून माहिती समोर आली आहे. मात्र वडिलानेच स्वतःच्या चिमुकली मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने बाप लेकीच्या अतूट नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.