ETV Bharat / state

Rana Couple In Amravati : अखेर 36 दिवसानंतर राणा दाम्पत्य अमरावतीत परतले; शिवसैनिकांची पोस्टरबाजी - हनुमान चालिसा वाद

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( Ravi Rana ) हे दोघेही 23 एप्रिलला अमरावतीवरून मुंबई मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) पठणासाठी गेले होते. आज हे दोघेही तब्बल 36 दिवसानंतर अमरावती शहरात ( Rana Couple Reached At Amravati ) परतले.

Rana Couple In Amravati
Rana Couple In Amravati
author img

By

Published : May 28, 2022, 7:45 PM IST

अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( Ravi Rana ) हे दोघेही 23 एप्रिलला अमरावतीवरून मुंबई मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa Controversy ) पठणासाठी गेले होते. आज हे दोघेही तब्बल 36 दिवसानंतर अमरावती शहरात ( Rana Couple Reached At Amravati ) परतले. नागपूरवरून जिल्ह्यात प्रवेश करताच तिवसा शहरापासून अमरावतीला पोहोचेपर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले.

तिवसा आणि मोझरीत जल्लोष - खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्या वाहनांचा ताफा नागपूरवरून तिवसाला पोहोचताच युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी जय श्रीरामचे नारे ही देण्यात आले. तिवसा येथून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ असणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथे राणा दाम्पत्याने राष्ट्रसंतांच्या समाधीचे दर्शन घेतले.

अमरावती शहरात सर्वत्र होणार स्वागत - अमरावती शहरात दाखल होताच राहाटगाव येथे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या गळ्यात क्रियेद्वारे भव्य हार घालण्यात येणार आहे. पंचवटी चौकातही फटाक्यांची आतषबाजी करून राणा दांपत्याचे स्वागत केले जाणार आहे. इरविन चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राणा दाम्पत्य अभिवादन करणार आहेत. राजकमल चौक येथे राणा दाम्पत्याचा भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानंतर रात्री नऊ वाजता रवी नगर येथील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण आयोजित करण्यात आले आहे.

शिवसैनिकांकडून पोस्टरबाजी - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 36 दिवसानंतर अमरावतीत आज परतले आहेत. 36 दिवस अमरावती बाहेर असणाऱ्या आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी राणा समर्थकांनी शहरभर स्वागताचे पोस्टर लावले असतानाच शिवसेनेच्यावतीने मात्र 36 दिवस बाहेर राहून अमरावतीला वार्‍यावर सोडणार्‍या या लोकप्रतिनिधींना कुठे काहीच सापडले नाही, शेवटी ते अमरावतीत परतले, अशा आशयाचे पोस्टर सर्वांचेच लक्ष वेधत आहे. आता राणा समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये पोस्टर वार सुरू झाले असल्याची चर्चा शहरात आहे.

हेही वाचा - Sanjay Raut on Shahu Maharaj Statement : भाजपने निर्माण केलेला संभ्रम शाहू महाराजांच्या विधानाने दूर झाला - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.