ETV Bharat / state

Rana Couple Diwali : राणा दाम्पत्यांची दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी; फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

Rana Couple Diwali Amaravati: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि बडनेराचे आमदार रवी राणा (Badnera MLA Ravi Rana) यांनी त्यांची दिवाळी शहरातील अंध आणि दिव्यांगांसोबत (Rana couple Diwali with disabled people) साजरी केली. (Diwali 2023) या निमित्तानं त्यांच्या शंकरनगर इथल्या निवासस्थानी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Rana Couple Diwali Amaravati
राणा दाम्पत्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 6:08 PM IST

अमरावती Rana Couple Diwali Amaravati: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी आज (रविवारी) आपल्या शंकर नगर स्थित निवासस्थानी शहरातील अंध, अपंग अशा असंख्य दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी उपस्थित दिव्यांगांना नवीन कपडे आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. विशेष म्हणजे, या सोहळ्यात भ्रमणध्वनीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थित सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. (Rana Couple Diwali 2023 Celebration)

सोहळ्यात आला उपमुख्यमंत्र्यांचा फोन : राणा दाम्पत्याच्या वतीनं दिव्यांगांसाठी आयोजित खास दिवाळी कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे नेहमीच गरिबांसह दिव्यांगांसोबत सण उत्सव साजरे करतात. याबद्दल राणा दाम्पत्याचं कौतुक केलं. "सण, उत्सव, आनंद हा सर्व समाजासोबत साजरा केला तर त्याचा गोडवा अधिक असतो आणि त्याचे पुण्य देखील अधिक असते" असे देखील उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी सोहळ्यात उपस्थित सर्व दिव्यांगांना शुभेच्छा देखील दिल्या. "दिव्यांगांना दर महिन्यात पंधराशे रुपये मानधन दिलं जाणार असून डिसेंबर महिन्यापासून वाढीव मानधन हे नियमित तारखेलाच मिळेल", असं सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सर्व समाजातील दिव्यांगांची उपस्थिती : राणा दाम्पत्याच्या वतीनं आयोजित दिव्यांगांच्या दिवाळी मिलन सोहळ्याला अमरावती शहरात सहल लगतच्या ग्रामीण भागातील सर्वच जाती धर्मातील दिव्यांग मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दिवाळी निमित्तानं राणा दाम्पत्याच्या वतीनं मिळालेल्या मान सन्मानामुळे दिव्यांग बांधव भारावून गेलेत. या सोहळ्यात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या उत्साहात सहभागी झालेत.

हेही वाचा:

  1. Fadnavis Appeal On Diwali: फटाके फोडा, दिवे लावा, पण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन
  2. Diwali 2023 : शिर्डीत दिवाळीचा जल्लोष; आंध्र प्रदेशच्या साईभक्तानं दिलं तब्बल 12 लाखांचं दान
  3. PM Narendra Modi Visit Himachal : पंतप्रधानांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी; देशवासियांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी करताना राणा दाम्पत्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.