ETV Bharat / state

287 ठिकाणी मी काँग्रेसचा प्रचार करणार; अचलपूरमध्ये मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध प्रचाराला यावे - डॉ. राजेंद्र गवई - assembly election maharashtra news

अचलपूर मतदार संघातून आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.

डॉ राजेन्द्र गवई
author img

By

Published : Sep 25, 2019, 11:54 AM IST

अमरावती - केवळ अचलपूर मतदार संघासाठी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडी तुटू नये अशी आमची भूमिका आहे. या भूमिकेमुळेच आम्ही सोमवारी तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. दर्यापूर मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली. या ठिकाणी आमचे बळवंत वानखडे उमेदवार असतील आणि अचलपूर मतदार संघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे. या ठिकाणी काँग्रेसचे बबलू देशमुख उमेदवार असतील तर राज्यातील 286 मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असतांनाच अचलपूर मतदार संघात काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात प्रचाराला यावे, असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी केले आहे.

डॉ राजेन्द्र गवई

अचलपूर मतदार संघातून आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा डॉ. राजेंद्र गवई यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भात माहिती देताना गवई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत केली. विधानसभा निवडणुकीत आम्हाला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अचलपूर मतदारसंघ मिळावे अशी मागणी केली होती. सोमवारी हा तिढा सोडविण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसने दर्यापूर मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडण्याची तयारी दर्शविली. दर्यापूर मतदारसंघात आमच्या पक्षाच्या वतीने बळवंत वानखडे निवडणूक लढणार हे मी आधीच स्पष्ट केले आहे. अचलपूर मतदारसंघ मात्र, माझ्यासाठी सोडावा अशी मागणी मी काँग्रेसकडे केली याबाबत काँग्रेसकडून कुठलेही स्पष्टीकरण आले नाही. असे असले तरी 3 ऑक्टोबरला मी अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे असे गवई म्हणाले.

हेही वाचा - अमरावती महापालिकेची स्वच्छता 'नौटंकी'

अचलपूर मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार राहणार आहे. वास्तविक पाहता आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससाठी जागा सोडू शकतो मग बबलू देशमुख यांनी अचलपूर मतदार संघातून माघार घेण्यास हरकत नाही. असे असताना बबलू देशमुख हे अचलपूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार असतील तर मी सुद्धा अचलपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असेल. यामुळे मी राज्यातील 287 मतदारसंघात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार हे निश्चित आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र, बबलू देशमुख यांच्यासाठी अचलपूर मतदार संघात माझ्याविरुद्ध प्रचाराला यावे माझी कुठलीही हरकत राहणार नाही असे गवई यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा - शहरात पावणेचार लाखांचा गुटखा जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

Intro:केवळ अचलपूर मतदार संघासाठी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आघाडी तुटू नये अशी आमची भूमिका आहे या भूमिकेमुळेच आम्ही सोमवारी तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. दर्यापूर मतदार संघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया देण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली. या ठिकाणी आमचे बळवंत वानखडे उमेदवार असतील आणि अचलपूर मतदार संघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे .या ठिकाणी काँग्रेसचे बबलू देशमुख उमेदवार असतील तर राज्यातील 286 मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असतांनाच अचलपूर मतदार संघात काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्याविरोधात प्रचाराला यावे असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केले आहे.

Body:अचलपूर मतदार संघातून आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज पत्रकार परिषदेत केली . यासंदर्भात माहिती देताना डॉ. राजेंद्र गवई म्हणाले,लोकसभा निवडणुकीत आम्ही आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मदत केली. विधानसभा निवडणुकीत आम्हाला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि अचलपूर मतदारसंघ मिळावे अशी मागणी केली होती. सोमवारी हा तिढा सोडविण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. काँग्रेसने दर्यापूर मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडण्याची तयारी दर्शविली . दर्यापूर मतदारसंघात आमच्या पक्षाच्या वतीने बळवंत वानखडे निवडणूक लढणार हे मी आधीच स्पष्ट केले आहे. अचलपूर मतदार संघ मात्र माझ्यासाठी सोडावा अशी मागणी मी काँग्रेसकडे केली याबाबत काँग्रेस कडून कुठलेही स्पष्टीकरण आले नाही. असे असले तरी 3 ऑक्टोबरला मी अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. अचलपूर मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार राहणार आहे. वास्तविक पाहता आम्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस साठी जागा सोडू शकतो मग बबलू देशमुख यांनी अचलपूर मतदार संघातून माघार घेण्यास हरकत नाही. असे असताना बबलू देशमुख हे अचलपूर मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार असतील तर मी सुद्धा अचलपूर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असेल. यामुळे मी राज्यातील 286 मतदारसंघात काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या या आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार हे निश्चित आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र बबलू देशमुख यांच्यासाठी अचलपूर मतदार संघात माझ्याविरुद्ध प्रचाराला यावे माझी कुठलीही हरकत राहणार नाही असे डॉ.राजेंद्र गवई यांनी स्पष्ट केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.