ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी

author img

By

Published : Aug 20, 2021, 3:35 PM IST

अमरावती शहारात मंगळवारी रात्रभर, तसेच बुधवारी आणि गुरुवारी रात्रभर पाऊस झाला. मंगळवारी शहारत एकूण 48 मि.मी पाऊस झाला. तर, बुधवारी 47.5 मि. मी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी पहाटेही रिमझिम पाऊस बरसला असून, आजही दिवसभरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी
अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी

अमरावती - महिनाभराच्या विश्रांतीनंतर सलग पाच दिवसांपासून अमरावती शहरात पाऊस कोसळतो आहे. श्रावणातला रिमझिम पाऊस सुखावणारा असतानाच शहरातील अस्ताव्यस्त रस्त्यांमुळे शहरातील मुख्य चौकांसह बाजरपेठ पाणी मोठ्या प्रमाणात तुंबले आहे. दरम्यान, शहरातील नमुना परिसर, शेगाव नाका, कृष्णा नगर, गाडगेनगर राठी नगर या भागात रस्त्यावरून तसेच नाल्यातून वाहणारे पाणी अनेकांच्या घरात शिरत असल्याने या भागातील रहिवाशांना सर्वाधिक फटका बसला आहे.

दोन दिवसांपासून जोरदार पाऊस

शहरात अनेक भागात पाणी साचले

काँक्रीटीकरणामुळे मुख्य रस्त्यांची उंची वाढली आहे. यामुळे रस्त्यावरील पाणी लगतच्या व्यापारी संकुलात शिरत असल्याने अनेक व्यापारी संकुलातील व्यवसायिक त्रस्त झाले आहेत. गाडगेनगर, शेगाव नाका, जयस्तंभ, राजकमल, राजापेठ, नावाथे चौक, साईनगर, बडनेरा आहे सर्वच मुख्य भागात रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यास योग्य नियोजन नसल्याने, पाणी रस्त्यावरून थेट व्यापारी संकुल आणि काही भागात नागरिकांच्या घरात शिरत आहे. श्याम चौक, गांधी चौक, प्रभात चौक या वर्दळीच्या भागात पाण्याचे डबके साचले असल्याने नागरिकांची तारांबळ उडली आहे.

दोन्ही तलाव ओव्हरफ्लोच्या प्रतीक्षेत

अमरावती शहरातील वडाळी आणि छत्री हे दोन्ही तलाव अद्याप पूर्ण भरले नाहीत. वडाळी तलावाच्या सध्या दोन पायऱ्या अद्याप पाण्याच्या वरच आहे. हे दोन्ही तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर शहरातून वाहणाऱ्या अंबानाल्याला पूर आल्यावर अनेक भागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने यावर्षी नाल्याची सफाई हवी तशी केली नसल्यानेस, नाल्याच्या पुराचा फटका फ्रेजरपुरा, नमुना, अंबापेठ या भागांना बसण्याची भीती आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.