ETV Bharat / state

#Cyclone 'निसर्ग' : विदर्भातही दोन दिवस होणार सर्वदूर पाऊस - Nisarga cyclone effect amravati

निसर्ग चक्रीवादळ कमजोर पडुन बुधवारी त्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले. यानंतर ते ईशान्य-पूर्व दिशेने सरकले. आज (गुरुवारी) सकाळी ते आणखी कमजोर झाले. हे डिप्रेशन गुरुवारी सकाळी अकोल्यावरुन नैऋत्यकडे 100 किमी अंतरावर पश्चिम विदर्भावर सक्रिय आहे.

Nisarga cyclone effect in vidharbha
निसर्ग चक्रिवादळ प्रभाव विदर्भ
author img

By

Published : Jun 4, 2020, 7:24 PM IST

अमरावती - निसर्ग चक्रीवादळामुुुलेे बुधवारी मुंबई, पुणे व पश्चिम महाराष्ट्रात शेती पिकांचे नुकसान झाले. यानंतर हे चक्रीवादळ विदर्भात कमजोर पडून ते विरणार असल्याची शक्यता अमरावती हवामान खात्याने वर्तवली आहे.

निसर्ग चक्रीवादळ कमजोर पडुन बुधवारी त्याचे डिप्रेशनमध्ये रुपांतर झाले. यानंतर ते ईशान्य-पूर्व दिशेने सरकले. आज (गुरुवारी) सकाळी ते आणखी कमजोर झाले. हे डिप्रेशन गुरुवारी सकाळी अकोल्यावरुन नैऋत्यकडे 100 किमी अंतरावर पश्चिम विदर्भावर सक्रिय आहे. ते रात्री विरुन जाण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे विदर्भात आज (गुरुवारी) सर्वदूर हलक्या-मध्यम, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

याबरोबरच पावसाचे प्रमाण पूर्व विदर्भात जास्त राहील. तर दोन दिवस विदर्भात सर्वत्र सर्वदूर पाऊस पडणार असल्याचे अमरावतीचे हवामान खात्याचे प्रमुख डॉ. अनिल बंड यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.