ETV Bharat / state

अमरावती : बडनेरात किसान मोर्चाच्यावतीने 'रेल रोको' आंदोलन

नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात 'रेल रोको' आंदोलन करण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर 'रेल रोखो' आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

rail roko agitation on behalf of kisan morcha in badnera
अमरावती : बडनेरात किसान मोर्चाच्यावतीने 'रेल रोको' आंदोलन
author img

By

Published : Feb 19, 2021, 3:50 AM IST

अमरावती - केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान संघटनेसह आदी शेतकरी संघटनांनी राज्यभर आज 'रेल रोको' आंदोलन केले. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर 'रेल रोखो' आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी 20 ते 25 आंदोलकाना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकानी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कृषी कायदे तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.

प्रतिक्रिया

आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले -

केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दोन महिने उलटून या आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सर्व शेतकरी संघटना संतप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला होता. आज अमरावतीच्या बडनेरा रेल्वे स्टेशन वर शेतकऱ्यांच्यावतीने 'रेल्वे रोको' आंदोलन करण्यात येणार होते. यावेळी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा - मुंबईतील कोरोनाचे नवे 'हॉटस्पॉट' - बोरीवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूरमध्ये रुग्णवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.