ETV Bharat / state

Egg Production Poultry Farm : दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन, विदर्भातील एकमेव अत्याधुनिक पोल्ट्री

author img

By

Published : Oct 7, 2022, 4:08 PM IST

Updated : Oct 8, 2022, 4:19 PM IST

अमरावती जिल्ह्यात अंजनगाव बारी येथे रवींद्र मेटकर हे शेतकरी आज दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन ( Production of one lakh and twenty thousand eggs per day ) घेत आहेत. अंड्यांचे विक्रमी उत्पादन घेणारे रवींद्र मेटकर हे विदर्भातील एकमेव पोल्ट्री फार्म व्यवसाय असून त्यांचा पर्यावरण पूरक असणारा मातोश्री पोल्ट्री फार्म हा विदर्भातील सर्वात अत्याधुनिक असणारा पोल्ट्री फार्म आहे.

eggs
Egg Production Poultry Farm

अमरावती - अमरावती जिल्ह्यात अंजनगाव बारी येथे रवींद्र मेटकर हे शेतकरी आज दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन ( Production of one lakh and twenty thousand eggs per day ) घेत आहेत. अंड्यांचे विक्रमी उत्पादन विक्रमी उत्पादन घेणारे रवींद्र मेटकर हे विदर्भातील एकमेव पोल्ट्री फार्म व्यवसाय असून त्यांचा पर्यावरण पूरक असणारा मातोश्री पोल्ट्री फार्म हा विदर्भातील सर्वात अत्याधुनिक असणारा पोल्ट्री फार्म आहे. रवींद्र मेटकर यांनी शेतीला जोडधंदा म्हणून सुरू केलेल्या पोल्ट्री फार्म च्या व्यवसायाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून त्यांना कृषी क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले आहे. शेतीला असणाऱ्या जोडधंदाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता मिळविण्याचा आदर्शच जणू रवींद्र मेटकर यांनी आपल्या पोल्ट्री फार्म व्यवसायाद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.

एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन

असा आहे अत्याधुनिक पोल्ट्री फार्म - गत 37 वर्षांपासून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणारे रवींद्र मेटकर यांनी यावर्षी ऑगस्ट महिन्यात अमरावती ते अंजनगाव बारी मार्गावर आपल्या शेतामध्ये अत्याधुनिक असा पोल्ट्री फार्म उभारला आहे. स्वयंचलित असणाऱ्या उपकरणांनी हा पोल्ट्री फार्म सज्ज ( poultry farm equipped with automatic equipment ) आहे. 30 हजार 500 कोंबड्या या ठिकाणी असून या ठिकाणी केवळ एक बटन दाबल्यावर या कोंबड्यांना मशीन द्वारे खाद्य पुरविले जाते. तसेच कोंबड्यांची विष्ठा देखील स्वयंचलित यंत्रणेद्वारे अत्याधुनिक शेड मधून बाहेर काढली जाते. कोंबड्यांनी दिलेली अंडी सुद्धा स्वयंचलित पद्धतीने एका ठिकाणी जमा होतात. या केंद्रात केवळ दोन महिलांच्या साह्याने एका ठिकाणी जमा जमा होणारे हे सर्व अंडे ट्रे मध्ये भरल्या जातात. या कोंबड्यांच्या शेडमध्ये योग्य तापमान राखण्यासाठी वातानुकूलित यंत्रणेची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छ वातावरणात या पोल्ट्री फार्म मध्ये सर्व कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व सुविधेमुळे या कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता तीन ते चार टक्के अधिक राहते अशी माहिती रवींद्र मेटकरी यांनी ' ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

Egg Production Poultry Farm
अंड्यांचे विक्रमी उत्पादन

मध्य प्रदेशात अंड्यांना मोठी मागणी - अंड्यांची विक्री करण्यासाठी आम्हाला फारसा त्रास होत नाही. आमच्या पोल्ट्री फार्म वरूनच सर्व अंडी खपली जातात. मध्य प्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर ,इंदोर ,झांसी या शहरांमध्ये आमच्या पोल्ट्री फार्म ची अंडी जातात. यासह गुजरातच्या सुरत शहरात देखील आमच्या इथून अंडी नियमित जात असल्याची माहिती रवींद्र मेटकरी यांनी दिली.

Egg Production Poultry Farm
दिवसाला एक लाख वीस हजार अंड्यांचे उत्पादन

दिवसाला साडेतीन लाख रुपये खर्च - अत्याधुनिक पद्धतीने चालविल्या जाणार्‍या ह्या पोल्ट्री फार्मवर संपूर्ण व्यवस्थेसाठी एकूण 50 कुशल कामगार कार्यरत आहेत. यासह कोंबड्यांना लागणाऱ्या खाद्यांची व्यवस्था पाहणे परिसराची स्वच्छता आणि इतर सर्व कामही कामगारांच्या माध्यमातून केली जातात. कामगारांच्या वेतनासह कोंबड्यांना रोज एकूण 13 टन खाद्य पुरविले जाते. एका दिवसाच्या व्यवस्थेचा संपूर्ण खर्च हा साडेतीन लाख रुपये येतो असे रवींद्र मेटकर यांनी सांगितले.

Egg Production Poultry Farm
विदर्भातील एकमेव अत्याधुनिक पोल्ट्री

विष्ठेचा खत म्हणून उपयोग - अत्याधुनिक शेडमध्ये असणाऱ्या कोंबड्यांची विष्ठा ही शेड मधून बाहेर काढल्यावर तिचा खत म्हणून उपयोग केला जातो. रवींद्र मेटकर हे स्वतःच्या शेतात कोंबड्यांची विष्ठा खत म्हणून वापरतात तसेच इतर शेतकऱ्यांना एक रुपया दहा पैसे दराने हे खत विकतात. पिकांसाठी कोंबड्यांची विस्था ही उत्तम खत असल्याचे रवींद्र मेटकर म्हणतात.

Egg Production Poultry Farm
अंड्यांचे विक्रमी उत्पादन

वयाच्या सोळाव्या वर्षी सुरु केला व्यवसाय - रवींद्र मेटकरी यांनी 1984 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी आपल्या घराच्या छतावर कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यावेळी एकूण शंभर कोंबड्या त्यांच्याकडे होत्या. आपल्या व्यवसायात सातत्य ठेवून हा व्यवसाय त्यांनी हळूहळू वाढवला आणि पुढे आपल्या शेतात त्यांनी पोल्ट्री फार्मला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे दिवसाला एक लाख वीस हजार अंडी देणाऱ्या कोंबड्या आहेत.

Egg Production Poultry Farm
पोल्ट्री फार्म

अनेक पुरस्कारांनी झाला सन्मान - कृषी आणि कृषी उद्योगाला जोड देणाऱ्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी रवींद्र मेटकर यांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या वतीने 2021 चा मानाचा असा जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार तथा जगजीवन राम नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. देशभरात एकूण तीन जणांना हा पुरस्कार मिळाला असून महाराष्ट्रातील रवींद्र मेटकर हे या पुरस्काराचे एकमेव मानकरी ठरले आहे. यापूर्वी 2003 मध्ये महाराष्ट्राला या पुरस्काराचा मान मिळाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच रवींद्र मेटकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासह महाराष्ट्र शासनाचा 2014 मध्ये शेतीनिष्ठ पुरस्कार देखील रवींद्र मेटकर यांना मिळाला आहे.

Last Updated : Oct 8, 2022, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.