ETV Bharat / state

अमरावतीच्या सायकल मॅरेथॉनमध्ये खासदार नवनीत राणांनी चालवली सायकल - Amravati latest news

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सायकल चालवली. तसेच रॅलीतील सहभागी व्यक्तींशी दिलखुलास संवाद साधला.

cycle rally in Amravati
हिंदुस्थान पेट्रोलियम सायकल रॅली
author img

By

Published : Jan 19, 2020, 6:17 PM IST

Updated : Jan 19, 2020, 8:32 PM IST

अमरावती - पर्यावरण संवर्धनासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे शहरात सायकल रॅली काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुलात या रॅलीच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सायकल चालवून उपस्थितांमध्ये उत्साह जागवला.

पालकमंत्री यशोमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सायकल चालवली. तसेच रॅलीतील सहभागी व्यक्तींशी दिलखुलास संवाद साधला. आमदार सुलभा खोडके, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, हिंदुस्थान पेट्रोलियमचे नागपूर क्षेत्रीय प्रबंधक मुकुंद जवंजाळ, क्षेत्रीय विपणन अधिकारी विशाल सूर्यवंशी, विनोद साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.

सायकल मॅरेथॉनमध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग

हेही वाचा - अमरावतीमध्ये 'पाणी वाचवा, स्वच्छता अभियान प्रदर्शनी' संपन्न

प्रदूषण रोखण्यासाठी निसर्ग आणि मन दोहोंची जपणूक करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅलीसारखे उपक्रम सतत राबवले जावेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण जपण्यासाठी 'अधिक सायकल, कमी मोटरसायकल' हा मंत्र अवलंबला पाहिजे, असे जलसंपदा राज्यमंत्री कडू यांनी सांगितले. खासदार श्रीमती राणा, आमदार श्रीमती खोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवकांसह ज्येष्ठांनीही सहभाग घेतला होता.

हेही वाचा - 'कायद्याच्या नावाखाली जातीयवाद वाढविण्याचा भाजपचा डाव'

Intro: महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जलसमद राज्यमंत्री बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीत सायकलवर स्वार होऊन पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.
Body:
पर्यावरण संवर्धनासाठी हिंदुस्थान पेट्रोलियमतर्फे शहरात सायकल रॅली काढण्यात आली. विभागीय क्रीडा संकुलात त्याच्या समारोपप्रसंगी मान्यवरांनी सायकल चालवून उपस्थितांमध्ये उत्साह जागविला. 
पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांनी यावेळी सायकल चालवली व रॅलीत सहभागी व्यक्तींशी दिलखुलास संवाद साधला. आमदार सुलभा खोडके, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, हिंदुस्थान पेट्रोलियमचे नागपूर क्षेत्रीय प्रबंधक मुकुंद जवंजाळ, क्षेत्रीय विपणन अधिकारी विशाल सूर्यवंशी, विनोद साळुंखे आदी उपस्थित होते. 
प्रदूषण रोखण्यासाठी निसर्ग आणि मन दोहोंची जपणूक करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सायकल रॅलीसारखे उपक्रम सतत राबवले जावेत, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

      Conclusion:पर्यावरण जपण्यासाठी 'अधिक सायकल, कमी मोटरसायकल' हा मंत्र अवलंबला पाहिजे, असे जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी सांगितले. खासदार श्रीमती राणा, आमदार श्रीमती खोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी व युवकांसह ज्येष्ठांनीही रॅलीत उत्साहाने सहभाग घेतला.
Last Updated : Jan 19, 2020, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.