अमरावती - लोकांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे वसुली करणाऱ्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अमित धनकर असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यासह एक खाजगी इसम अजय तायडेही अटक करण्यात आली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यात फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनचा एक पोलीस कर्मचारी बळजबरीने लोकांकडून पैसे वसुल करीत असल्याची माहिती ठाणेदार दीपक वानखडेंना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास मालखेड तलाव परिसरात पोलीस कर्मचारी अमित धनकर आणि एक खाजगी इसम अजय तायडे आले. तेथे एक व्यक्ती जेवण करीत असताना या दोघांनी त्याला पैशाची मागणी केली. यावेळी त्याच्याकडून पैसे घेताना ठाणेदार व कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनाही रंगेहात पकडले. यानंतर पोलीसांनी आरोपी अमित धनकर व खाजगी इसम अजय तायडे याच्याविरूध्द भारतीय दंड विधानचे कलम ३९२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली