ETV Bharat / state

अमरावती हिंसाचारप्रकरणी 3 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ॲडमिनसह 7 जणांवर कारवाई - अमरावती हिंसाचार अपडेट

अमरावती शहरात 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचार प्रकरणी (Amravati violence case ) सायबर क्राइमचा एक मोठा अहवाल मागील आठवड्यात समोर आला होता. यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व फेक न्युज या देखील हिंसाचाराला कारणीभूत ठरल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

Amravati
अमरावती
author img

By

Published : Nov 24, 2021, 10:32 AM IST

अमरावती - अमरावती हिंसाचार प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. अमरावती शहरात 12 आणि 13 तारखेला झालेल्या हिंसाचार प्रकरणी (Amravati violence case ) सायबर क्राइमचा (Maharashtra Cyber Cell ) एक मोठा अहवाल मागील आठवड्यात समोर आला होता. यामध्ये आक्षेपार्ह पोस्ट, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व फेक न्युज या देखील हिंसाचाराला कारणीभूत ठरल्याचं या अहवालात म्हटलं आहे. त्याच अनुषंगाने आता सायबर क्राईमच्यावतीने आरोपींवर कारवाई केली जात आहे. अमरावती हिंसाचार प्रकरणात सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवल्या प्रकरणी 3 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ॲडमिन सह सात जणांवर सायबर क्राईम पोलिसने कारवाई केली असल्याची माहिती अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉक्टर सिंग यांनी दिली आहे.

अमरावती हिंसाचारप्रकरणी 3 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ॲडमिनसह 7 जणांवर कारवाई
अमरावतीमध्ये जो हिंसाचार झाला यासाठी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या होत्या. ज्याच्या माध्यमातून या हिंसाचाराला खतपाणी मिळाले. अशा अनेक पोस्ट पोलिसांनी तपासल्या असून त्याचा अहवालही गृहमंत्रालयाला पाठवला होता. दरम्यान अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.अमरावती हिंसाचाराच्या नंतर पुन्हा असा प्रकार घडू नये. तसेच चुकीचे मेसेज, चुकीच्या बातम्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करू नये. यासाठी जवळपास सात दिवस अमरावती शहरातील इंटरनेट सेवा ही पोलिसांच्या वतीने बंद करण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.