ETV Bharat / state

एक हजाराची लाच स्वीकारताना पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

सुरेंद्र बाळकृष्‍ण कोहरे(50) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे.

Amravati
अमरावती
author img

By

Published : Jan 8, 2020, 8:08 AM IST

अमरावती - शेतकऱ्याविरोधात पोलीस ठाण्यातील दाखल तक्रार ही अदखलपात्र करण्यासाठी लाच स्वीकरणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी गावात ही घटना घडली आहे. या पोलीस कॉन्स्टेबलने 1 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

सुरेंद्र बाळकृष्‍ण कोहरे (50) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील एका शेतकऱ्याविरुद्ध चांदुर रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आली होती. दरम्यान, या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यासाठी सुरेंद्र कोहरे यांनी संबंधित शेतकऱ्याला 5 हजार रुपयांची लाच मागितली. त्यावेळी आपण 5 हजार रुपये आपण देऊ शकत नाही. 1 हजार रुपये देण्याची तयारी असल्याचे शेतकऱ्याने सांगितल्यावर कोहरे यांनी 1 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

हेही वाचा - धक्कादायक ! अमरावतीत पुन्हा एका ६ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

दरम्यान, शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी चांदुर रेल्वे पंचायत समितीजवळ सापळा रचला. तक्रारदार शेतकऱ्याकडून पोलीस हेडकॉन्स्टेबल कोहरे यांनी 1 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक पंजाब डोंगरदिवे, पोलीस उपाधीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष शेगोकार, पोलीस हवालदार श्रीकृष्ण तालन, प्रमोद धानोरकर, युवराज राठोड, पोलीस शिपाई आशिष जांभळे, महेंद्र साखरे यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा - चांदुर बाजारमध्ये प्रतिबंधित 'नायलॉन मांजा'ची विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे

Intro:(वीडियो वेब मोजोला पाठवला)
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात या गावातील शेतकऱ्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रार ही अदखलपात्र करण्यासाठी एक हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष लाच स्वीकारताना पकडले.

Body:सुरेंद्र बाळकृष्‍ण कोहरे(50) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील बग्गी या गावातील एका शेतकरी विरुद्ध चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आली होती. दरम्यान या प्रकरणात आपण अदखलपात्रा गुना नोंदविण्यासाठी सुरेंद्र कोहरे यांनी संबंधित शेतकऱ्याला पाच हजार रुपयांची लाच मागितली. पाच हजार रुपये आपण देऊ शकत नाही एक हजार रुपये देण्याची तयारी असल्याचे शेतकऱ्याने म्हटल्यावर सुरेंद्र कोहरे यांनी 1000 रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली. दरम्यान शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज चांदुर रेल्वे पंचायत समिती जवळ सापळा रचला. तक्रारदार शेतकऱ्याकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र कोहरे यांनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे , अप्पर पोलीस अधीक्षक पंजाब डोंगरदिवे,पोलीस उपाधीक्षक गजानन पडघम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष शेगोकार, पोलीस हवालदार श्रीकृष्ण तालन, प्रमोद धानोरकर,युवराज राठोड, पोलीस शिपाई आशिष जांभळे ,महेंद्र साखरे यांनी ही कारवाई केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.