अमरावती : पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ( Police Commissioner Navinchandra Reddy ) यांनी अमरावती पोलीस आयुक्तपदाचा कारभार ( Navinchandra Reddy Asserted ) स्वीकारल्यानंतर, अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या ( Efforts will be Made to Maintain Law and Order ) आहेत. शहराच्या कोणत्याही पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे होणार नाही. याची काळजी घेणार असल्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.
नवीनचंद्र रेड्डी यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला चोरी, घरफोडी, मालमत्ता, खून, हाणामाऱ्या तसेच इतर किरकोळ स्वरूपातील गुन्हे आपल्या पोलीस आयक्तालयाच्या हद्दीमध्ये घडणार नाही, यासाठी विशेषत्वाने काळजी घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या बदलीनंतर नवीनचंद्र रेड्डी यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
नवीन पोलीस आयुक्तांचे अमरावतीकरांना आवाहन शहरात शांतता प्रस्थापित होईल, कुठल्याही स्वरूपाचे गंभीर गुन्हे घडणार नाहीत किंवा घडत असल्यास त्याविषयी नागरिकांनी स्वतःवर येऊन पुढाकार घेऊन आम्हाला आमच्याशी संपर्क करावा. नागरिकांनी याकरिता सहकार्य करावे, अशी भूमिकासुद्धा त्यांनी यावेळी मांडली. एखाद्या वेळेस स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तक्रारीचे निराकरण न झाल्यास आपण थेट माझ्याशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी अमरावतीकरांना केले आहे.
डॉ. आरती सिंग आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद विकोपाला डॉ. आरती सिंग आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर डॉक्टर आरती सिंग यांची बदली होण्याची हालचालींना गती येईल, असे वाटत होते. तशा चर्चासुद्धा रंगल्या होत्या. परंतु, त्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्यात. डॉ. आरती सिंग यांच्या कार्यकाळात अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले होते. कायदा व सुव्यवस्था त्यांनी नियंत्रणात आणली होती. आता नवीनचंद्र रेड्डी यांनी आयुक्तपदाचा स्वीकार कारभार स्वीकारल्यानंतर ते कशा पद्धतीने अमरावती शहरातील गुन्हेगारावरती लक्ष ठेवतात याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागून आहे.