अमरावती - राज्यात एकीकडे कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात आता पेट्रोलचे भावाने शंभरी पार केली आहे. कोरोनाकाळात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. तर व्यवसायही ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत आता पेट्रोलच्या भावाने शंभरी पार केल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचे चित्र आहे.
आज अमरावती शहरातील पेट्रोलचा दर हा शंभर रूपये दहा पैशे इतका आहे. तर डिझेलचा दर हा 91.60 पैसे इतका आहे. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोलचे दर वाढतच आहे. त्यातच आज पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली.
हेही वाचा - 'तौक्ते' चक्रीवादळ काही तासात कोकण किनारपट्टीला धडकणार, मुसळधार पावसाचा इशारा
इंधनाच्या किंमती का वाढत आहेत?
आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाच्या किमती 55 ते 60 डॉलर प्रती बॅरलवर पोहोचल्या आहेत. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढले आहे. भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन परदेशातून आयात केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे. शिवाय भारतात इंधनांवर विविध करदेखील आहेत. कारण, बरचसे इंधन आयात करत असल्यामुळे त्यावर केंद्र सरकारकडून उत्पादन आणि राज्य सरकार कडूनही व्हॅटसारखे कर लावण्यात येतात.
हेही वाचा - वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन तयार करायला परवानगी, अवघ्या बाराशे रुपयांत मिळणार इंजेक्शन