अमरावती - भजनासाठी आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून चहामध्ये पेट्रोल मिक्स करून ते प्यायला लावणाऱ्या महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल मिश्रीत चहा पिल्यामुळे पाच भाविकांची प्रकृती बिघडली होती. संभाजी उर्फ अंबादास महाराज असे या महाराचे नाव आहे.
हेही वाचा... ..तर अधिकाऱ्यांना दांडक्याने मारा; 'त्या' शेतकरी कुटुंबाला प्रवीण दरेकरांचा सल्ला
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील उमरी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. भजनाचा कार्यक्रम सुरू असताना महाराजाने प्रसाद म्हणून भाविकांना चहामध्ये पेट्रोल मिसळून ते प्यायला लावले. हे मिश्रण पिल्याने पाच भाविकांची प्रकृती बिघडली. या प्रकरणी भाविकांनी अंबादास महाराजाविरुद्ध राहिमापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर येथील महाराज संभा उर्फ अंबादास यांच्या भजनाचा कार्यक्रम दर्यापूर तालुक्यातील उमरी रासुलापूर या गावात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गावातील भजन मंडळी आणि गावकरी अंबादास महाराज समोर भजनाला बसले होते. दरम्यान भजन सुरू असताना अंबादास महाराज याने चहामध्ये पेट्रोल मिसळून ते प्रसाद म्हणून भाविकांना प्राशन करण्यास सांगितले. यावेळी भाविकांही श्रद्धेपोटी ते प्राशन केले. मात्र, काहीवेळानी भाविकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दर्यापूर येथील रुग्णालयात दाखल केले. यात अजय चव्हाण याची तब्येत अधिक खालावल्याने त्याला अमरावती येथे दाखल करण्यात आले.
हेही वाचा... कॅमेरे बंद झाल्यावरच कीर्तन करणार, इंदोरीकरांचा सावध पवित्रा
दरम्यान या प्रकारानंतर रहिमापूर पोलिसांनी अमरावती येथे रुग्णालयात जाऊन या युवकाचा जबाब नोंदवून घेतला. सर्व चौकशीनंतर रविवारी अंबादास महाराजाविरुद्ध रहिमापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.