ETV Bharat / state

आदर्श; वडाळी तलावाचा गाळ उपसण्यासाठी 'लोकचळवळ'

वडाळी तलावातील गाळ काढण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले होते.आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गाळ उपसण्यासाठी नागरिकांनी वडाळी तलावावर गर्दी केली.

वडाळी तलाव
author img

By

Published : May 18, 2019, 1:22 PM IST

अमरावती - शहरातील अतिशय महत्वाचा असलेला वडाळी तलाव 26 वर्षांनंतर कोरडा पडला आहे. महापालिका आयुक्तांनी तलावातील गाळ उपसण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तलावातील गाळ, कचरा उपसण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली. तलावातील गाळ उपसण्यासाठीच्या लोकचळवळीमुळे तलाव साफ होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

अमरावती शहरातील पर्यटनाचे केंद्र असणारा वडाळी तलाव हा अप्परवर्धा धरण निर्मितीपूर्वी शहरातील कॅम्प परिसरात पाणी पुरवठा करणारा महत्वाचा स्रोत होता. वडाळी तालावामुळे वडाळी परिसरसह कॅम्प परिसरातील विहिरींना पाण्याचे झरे आहेत. गत वर्षी अपुरा पाऊस पडला आणि यावर्षी कडाक्याच्या उन्हामुळे तलावातील पाणी आटले. या तलावातीळ गाळ यापूर्वी 10 वर्षांआधी काढला होता. आता तलावात गाळ, कचरा मोठ्याप्रमाणात साचला आहे.

महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी तलावातील गाळ उपसण्यासाठी शनिवारी आणि रविवारी एकत्र येण्याचे जनतेला आवाहन केले होते. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी शेकडो नागरिक वडाळी तलाव उपसण्यासाठी पुढे आले. आमदर डॉ. सुनील देशमुख, महापालिका आयुक्त संजय निपाणे, वडाळी प्रभागाचे नगरसेवक सपना ठाकूर, आशिष गावंडे, माजी महापौर अशोक डोंगरे, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, निसर्गप्रेमी आणि वडाळी परिसरातील नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. महापालिका प्रशासनाने तलाव उपसण्यासाठी पोकलँड, टिप्परही आणले आहेत.

Intro:( विडिओ मेल वर पाठवला)

अमरावती शहरातील अतिशय महत्वाचा वडाळी तलाव 26 वर्षानंतर कोरडा पडला आहे. आज या तलावातील गाळ, कचरा उपसण्यासाठी महापालिकेने केलेल्या आव्हानला प्रतिसाद देत आज सकाळी शेकडो नागरिकांची गर्दी तलाव साफ करण्यासाठी उसळली. तलावातील गाळ उपसण्यासाठीच्या लोकचलवलीमुळे तलाव साफ होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

Body:अमरावती शहरातील पर्यटनाचे केंद्र असणारा वडाळी तलाव हा आपर्वार्धा धारण निर्मितीपूर्वी शहरातील कॅम्प परिसरात पाणी पुरवठा करणारा महत्वाचा स्रोत होता. वडाळी तालावामुळे वडाळी परिसरसह कॅम्प परिसरातील विहिरींना पाण्याचे झरे आहेत. गत वर्षी अपुरा पाऊस पडला आणो या वर्षी कडाक्याच्या उन्हामुळे तलावातील पाणी आटले. या तलावातीळ गाळ यापूर्वी 10 वर्षांआधी काढला होता. आता तलावात गाळ, कचरा मोठयप्रमाणात साचला आहे.आहापालिक आयुक्त संजय निपाणे यांनी तलावातील गाळ उपसण्यासाठी शनिवारी आणि रविवारी एकत्र येण्याचे जनतेला आवहान केले होते. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी शेकडो नागरिक वडाळी तलाव उपसण्यासाठी पुढे आलेत. आमदर डॉ. सुनील देशमुख, महापालिका आयुक्य संजय निपाणे, वडाळी प्रभागाचे नगरसेवक सपना ठाकूर, आशिष गावंडे, माजी महापौर अशोक डोंगरे, यांचासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी , निसर्गप्रेमी आणि वडाळी परिसरातील नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.महापालिका प्रशासनाने तलाव उपसण्यासाठी पोक लँड, टिप्परही आणले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.