ETV Bharat / state

अमरावती : बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

author img

By

Published : May 4, 2021, 7:20 PM IST

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, अमरावतीतील बाजार पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.

गर्दी
गर्दी

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच जात आहे. शासनाने कोरोनागर्स्तांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लावले आहेत. मात्र, अमरावतीत याचे काहीच परिणाम झाले नसल्याचे चित्र दिसत असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, बाजारात गर्दी केल्याचे दिसत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असून कोरोनाचा आकडा वाढणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

आज आढळले 1 हजार 123 रुग्ण

अमरावती जिल्ह्यात मंगळावरी (दि. 4 मे) 1 हजार 123 नवे कोरोनाबधित समोर आले आहेत. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 334 इतकी आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.09 टक्के तर रुग्ण दुपटीचा दर 114 टक्के इतका आहे.

सगळं सुरू प्रशासनाचे डोळे बंद

अमरावती शहरात मुख्य बाजारपेठ बंद दिसत असली तरी बंद दुकानात व्यवसायिक, कामगार आहेत. विशेष म्हणजे लपूनछपून दुकानाचे शटर उघडून ग्राहकही दुकानात येत आहेत. शहरातील जयस्तंभ, राजकमल, जवाहरगेट यासह बिझिलँड आणि सिटीलँड या ठिकाणी असा प्रकार सर्रास सुरू आहे. रस्त्याने विनाकारण फिरणाऱ्यांनावरही कुठलीही कारवाई होत नाही. महापालिकेच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी सकळी 9 ते 11 या वेळेत केवळ वाहनचालकांना अडवून त्यांची कोरोना चाचणी करून सोडून दिले जात आहे.

स्मशानात गर्दी कायम

कोरोनामुळे रोज अनेकजण दगवत असून शहरातील सर्वात मोठ्या आणि मुख्य स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंकरसाठी प्रचंड गर्दी होत आहे. या समशाभूमीला पर्याय शोधण्यासाठी जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी शहरातील सर्व स्मशानभूमीची पाहणी केली. त्यापैकी केवळ विलास नगर परिसरातील स्मशानभूमीत कोरोनाने दगवलेल्यांवर अंत्यसंस्कार होत असून स्मशानभूमीबाबत अद्याप कुठलाही निर्णय प्रशासनाने अद्याप घेतला नाही.

हेही वाचा - अमरावती जिल्ह्याला रोज 3000 रेमडीसीवर वायलचा पुरवठा करा; खासदार नवनीत राणा यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.