अमरावती: जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील येलकिपूर्णा या गावात एका लग्न समारंभानंतर जेवणातून 22 जणांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. या मध्ये लहान मुले, महीला, पुरुष, ज्येष्ट नागरिकाचा सहभाग आहे. रुग्णांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालय व कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
अशी आहे घटना: अचलपूर तालुक्यातील येलकिपूर्णा येथे राजकुमार दीपक पवार यांच्या लग्नसमारंभ नंतर 16 मे ला वरात जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर 16 ला मध्यरात्री लहान मुले, पुरुष, महीला, ज्येष्ट नागरिकांना चक्कर, मळमळ, उलट्या, जुलाब, ताप आदींचा त्रास सुरू झाला. यांनतर रुग्णांना एम्बुलेंसमध्ये अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 22 रुग्णामध्ये 10 लहान मुलाचा समावेश आहे. 22 रुग्णामध्ये 12 रुग्ण अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे, तर 6 रुग्णांवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर रुग्णाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
रुग्णांवर उपचार सुरू: या घटनेत अनेक रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत चरणदास पांडुरंग सोळंके (वय 40), सदाशिव सोळंके (वय - 35), हरी पवार (वय - 25), देवराम चव्हान (वय - 65), जया सोळंके (वय - 40), प्रफुल चव्हाण (वय -60), कु. पूर्वा चव्हान (वय - 08), कु. दिव्या चव्हाण (वय - 11 ), धीरज पवार (वय - 8), जीवन पवार (वय - 12 ), मानव पवार (वय - 12), शिवम पवार (वय - 12), सचिन सोळंके (वय - 42 ), गौरव सोळंके (वय- 13 ), डिंपल चव्हाण (वय - 03 ), सिंधू पवार (वय -35 ) यांचा समावेश आहे. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. देवकर, डॉ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर उपचार सुरू आहे.
हेही वाचा -