ETV Bharat / state

किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन अदा करा - राज्यमंत्री बच्चू कडू

कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार संबंधित आस्थापनेकडून वेतन अदा केले पाहिजे. येत्या आठ दिवसात संबंधित कंत्राटदाराकडून वेतन कपातीची रक्कम वसूल करुन कामगारांना तत्काळ अदा करावी, असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामगार विभागाला दिले आहे.

Pay the workers according to minimum wage law order given by bachhu kadu
किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना वेतन अदा करा - राज्यमंत्री बच्चू कडू
author img

By

Published : Aug 13, 2021, 10:50 PM IST

अमरावती - पीडीएमसीच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनातून एक हजार रुपयाची रक्कम कपात करुन घेण्यात आली असल्याच्या अनेक तक्रारी बच्चू कडू यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार चौकशी अंती ६०० कामगारांच्या वेतनातून एक हजार रुपयेप्रमाणे कपात झाली असल्याचे आढळून आले आहे. कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार संबंधित आस्थापनेकडून वेतन अदा केले पाहिजे. येत्या आठ दिवसात संबंधित कंत्राटदाराकडून वेतन कपातीची रक्कम वसूल करुन कामगारांना तत्काळ अदा करावी, असे निर्देश कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कामगार विभागाला दिले आहे.

प्रतिक्रिया

'आठ दिवसांत वेतन द्या' -

अमरावती येथील शासकीय विश्रामगृहात कामगार विभागाच्या कामकाजाचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला. किमान वेतन कायद्यानुसार सुरळीत वेतन मिळण्याचा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे. या अधिकारापासून वंचित राहिल्यास त्याची दाद मागण्याची कामगारांना मुभा आहे. त्यानुसार विभागाने चौकशी करुन येत्या आठ दिवसांत संबंधित कंत्राटदाराकडून वेतन कपातीची रक्कम वसूल करुन कामगारांना अदा करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा - MH CORONA : रुग्णसंख्या वाढ सुरूच.. आज ६,६८६ नवे रुग्ण, १५८ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.