अमरावती - जिल्ह्यातील अचलपूर येथील पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहायक या पदावर कार्यालयात असणाऱ्या देवेंद्र पुंडलीकराव आरेकर याला आज (दि. २० मे) अमरावती येथील लाचलुतपत पथकाने २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
कनिष्ठ सहाय्यक आरेकर याने तक्रारदारांच्या सेवा पुस्तिकेवर चटोपाध्याय व सहावा वेतन आयोग लागू केल्याबाबतच्या नोंदीवर लेखाधिकारी व जिल्हा परिषद यांची सही मिळविण्यासाठी व स्वीकृती पत्रासाठी २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यासंबंधी तक्रादाराने लाचलुचपत विभागात तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता आरोपीने पंचांसमक्ष २ ते ३ वाजेदरम्यान २ हजार रुपयांची लाच स्वीकारली. दरम्यान, लाच स्विकारत असताना पंचायत समिती येथील कार्यालय परिसरात आरोपील रंगेहात अटक करण्यात आली. ही कार्यवाही भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेच्या अमरावती परीक्षेत्राचे श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक, पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक गजानन पाडघम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र जेघे, अतुल टाकरखेडे, पोलिस कॉन्स्टेबल पंकज बोरसे, शैलेश कडू, महेंद्र साखरे, चालक सतीश कीटूकले यांनी पार पाडली.