ETV Bharat / state

अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसीतील कंपन्यांना ५० टक्के कामगार ठेवण्याचे आदेश - shailesh naval on corona

राज्य सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर कापड बनविणाऱ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये दररोज हजारो कामगार काम करतात. असे असताना कोरोना विषाणूचा विस्तार लक्षात घेता या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी ५० टक्के कामगारांनी टप्या टप्यात काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिले आहे.

corona amravati
नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत
author img

By

Published : Mar 22, 2020, 10:54 PM IST

अमरावती - जगभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून सर्वात जास्त रुग्ण हे राज्यात आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर अमरावतीच्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमध्ये चालणाऱ्या कापड निर्मिती कंपन्यांमध्ये फक्त ५० टक्केच कर्मचाऱ्यांनी काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी कंपन्यांना दिले आहेत.

राज्य सरकारच्या औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणावर कापड बनविणाऱ्या कंपन्या आहेत. रेमंड, सूर्यलक्ष्मी, व्हिएचएम, गोल्डन फायबर आदी नामांकित कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. या कंपन्यांमध्ये दररोज हजारो कामगार काम करतात. यातील काही कंपन्यांमध्ये महिला कामगार सुद्धा आहे. असे असताना कोरोना विषाणूचा विस्तार लक्षात घेता या कंपन्यात काम करणाऱ्या एकूण कामगारांपैकी ५० टक्के कामगारांनी टप्या टप्यात काम करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिले आहे.

गोल्डन फायबर कंपनीमध्ये कामगारांचे होत आहे स्कॅनिंग

दरम्यान, या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या गोल्डन फायबर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांचे स्कॅनिंग केले जात असून ठिक ठिकाणी हात धुण्यासाठी पाणी आणि साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक कामगाराला तोंडाला लावण्यासाठी मास्क दिल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर, कंपनीमध्ये ५० टक्केच कामगार काम करतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- #COVID 19 : तीन दुकाने फोडून चोरले सॅनिटायझर अन् मास्क, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.