अमरावती - वाढत्या कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सार्वजनिक परिवहन (एसटी) महामंडळानेही चालक-वाहक व यांत्रिकी कर्मचारी वगळून प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश एसटीच्या विभाग नियंत्रकांना दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्राप्त झाले आहे.
हेही वाचा - 'एक जिल्हा एक उत्पादन' योजनेबाबत परिपूर्ण नियोजन सादर करा; यशोमती ठाकूर यांचे कृषी विभागाला निर्देश
कर्मचाऱ्यांना आळीपाळीने बोलवा -
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश दिले आहेत. एसटीच्या विभागीय कार्यशाळेचा प्रवासी वाहतुकीशी थेट संबंध येतो. त्यामुळे चालक-वाहक कार्यशाळा कर्मचारी तसेच सर्व अधिकारी व पर्यवेक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना बघून प्रशासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के ठेवण्याच्या सूचना विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत. तातडीची व महत्त्वाचे काम सुरू राहील, यासाठी संबंधित खाते विभाग गटप्रमुख यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली चालक-वाहक कार्यशाळा कर्मचारी अधिकारी व पर्यवेक्षक पदावर कर्मचाऱ्यांना वगळून प्रशासकीय व कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात न बोलावता त्यांना आळीपाळीने बोलवावे. त्यानुसार कामाची नियोजन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर गहू उध्वस्त
31 मार्च पर्यंत नियम लागू -
कार्यालयीन कर्मचाऱ्यांना एकूण कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती राहील, याची दक्षता घ्यावी, असे पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, 31 मार्च पर्यंत हे नियम लागू असणार आहे.