ETV Bharat / state

Onion crisis : भाजपने बांधले चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण - Debt ridden farmers

कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने, भाजपने चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे (Onion crisis) तोरण बांधले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना भाजपने दिला कांदा भेट. शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान (subsidy for farmers) देण्याची भाजची मागणी.

भाजप कार्यकर्ते
BJP workers
author img

By

Published : Jun 7, 2022, 3:43 PM IST

अमरावती : कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने, भाजपने चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधले आहे. जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने कांद्याची लागवड करतात. परंतु सद्ध्या कांद्या उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात (Onion growers financial crisis) आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी भाजपने चांदुर बाजार तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण बांधले.

कांदा उत्पादक अडचणीत : तालक्यात कांद्याची लागवड करतेवेळी कांदा बियाण्याची टंचाई निर्माण झालेली होती. तरीदेखील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. हवामान बदलामुळे कांदा पीकांना शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. मजुरांची टंचाई तसेच मजुरीचे वाढते दर यामुळे त्यात आणखीनच भर पडली.

कांद्याला कवडीमोल भाव : कांद्याची साठवण क्षमता शेतकऱ्यांकडे नसल्याने त्यांना कांदा कवडीमोल भावात विकावा लागत आहे. चढ्या भावाने होणारी खतांची विक्री, बँकांकडून कर्ज (Debt-ridden farmers) मिळताना येणाऱ्या अडचणी, खाजगी सावकरीचा वेढा, नैराश्यातून वाढलेलं आत्महत्येच (Farmer suicide) प्रमाण अशा समस्यांनी वेढलेल्या शेतकऱ्यांना शेती नको म्हणायची वेळ आली आहे. कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून उत्पादन खर्चापेक्षा अत्यंत कमी भाव कांद्याला मिळत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना भाजपने कांदा भेट दिला आहे.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, धम्मराज नवले, सुरेश वानखडे, मयूर खापरे, नितीन टिंगणे, मनीष निमकर, गजानन कोल्हे, आकाश साबळे, प्रवीण राऊत, आकाश आजणकर, शुभम पांडे, निलेश वासनकर, वैभव घाटोड, स्वप्नील बोबडे, रमेश तायवाडे, प्रदीप पंडागरे, विजय थोराईत, अमर पावडे, संजय गवणेर,राजेश शेलोकर,सचिन तायवाडे, मंगेश वासनकर, आशिष टिंगने, प्रवीण गणोरकर, समिर वानखडे, दीपक निमकर, गजानन राऊत, दीपक सायरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- Who will win key RS seat ? राज्यसभेची सहावी जागा कोणाची? शुक्रवारी फैसला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.