अमरावती - जिल्ह्यातील माहुली पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहुली ते गोरळा मार्गावरील करजगाव फाट्यावर कार व ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उषा राजेंद्र फुसे, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा - अमरावतीत 40 हजारांची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत उषा राजेंद्र फुसे, पती राजेंद्र फुसे, मुलगा तुषार फुसे चालकासह (एमएच-40-के-आर-5700) कारने शेगावमधून दर्शन घेऊन वरूडला जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरने कारला धडक दिली. उषा फुसे यांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले आहेत.