ETV Bharat / state

मेळघाटात वाघिणीच्या हल्ल्यात युवक ठार तर अनेक जण जखमी

मेळघाटमधील धारणी तालुक्यातील दादरा गावात वाघिणीने शुक्रवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यु झाला आहे. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे दादरासह लगतच्या अनेक गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

मेळघाटात वाघिणीच्या हल्ल्यात युवक ठार तर अनेक जण जखमी
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:05 AM IST

अमरावती- मेळघाटमधील धारणी तालुक्यातील दादरा गावात वाघिणीने शुक्रवारी रात्री केलेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यु झाला आहे. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेमुळे दादरासह लगतच्या अनेक गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

शोभाराम चव्हाण असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दिलीप चव्हाण हा युवक गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी परिसरातून एक वाघीण मेळघाटात सोडण्यात आली आहे. या वाघिणीला वनविभागाने चिप बसवली असून ती जेथे कुठे संचार करते त्याची माहिती वनविभागाला कळते. ही वाघीण मेळघाटात आल्यापासून गेल्या काही दिवसात तिने अनेक गावांत दहशत पसरवली आहे. या वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी धारणी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वाघीण गावात येताच तिने एका ठिकाणी उभ्या असणाऱ्या पाच ते सहा युवकांवर अचानक हल्ला चढवला.

Intro:(जखमीआणी मृतकाचे चे फोटो मेलवर पाठवतो)

मेळघाटात धारणी तालुक्यात येणाऱ्या अतिदुर्गम अशा दादरा गावात वाघिणीने शुक्रवारी रात्री हल्ला चढवला. वाघिणीच्या हल्ल्यात गावातील एक युवक ठार झाला असून अनेक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे दादरासह लगतच्या अनेक गावांमध्ये खळबळ उडाली आहे.

Body: शोभाराम चव्हाण असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे असे वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर दिलीप चव्हाण हा युवक वाघिणीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी परिसरातून एक वाघीण मेळघाटात सोडण्यात आली आहे. या वाघिणीला वनविभागाने चिप बसवली असून ही वागिने जेथे कुठे संचार करते त्याची माहिती वनविभागाला कळते. ही वाघीण मेळघाटात आल्यापासून गेल्या काही दिवसात तिने अनेक गावात दहशत पसरलेली आहे. या वाघिणीचा बंदोबस्त करावा अशी मागणी धारणी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली होती. दरम्यान शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास या वागिने दादरा या अतिशय दुर्गम गावात अचानक हल्ला चढवला. गावात वाघीण शिरताच दादरा गावात खळबळ उडाली. वाघीण गावात येताच तिने अचानक एका ठिकाणी उभ्या असणाऱ्या पाच ते सहा युवकांवर हल्ला चढविला. वाघिणीच्या हल्ल्यात शोभाराम चव्हाण हा युवक फार झाला असून दिलीप चव्हाण हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या वाघिणीचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून मेळघाटातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. असे असताना वनविभागाने ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेतली नाही. आज दादा गावात वाघिणीने हल्ला चढवून युवकाचा बळी घेतल्याने वर्ण विभागाविरोधात धारणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.