ETV Bharat / state

परिचारिकांचा रोष : सात दिवस काळ्या फिती लावून केले काम; मंगळवारपासून काम बंद!

author img

By

Published : Sep 7, 2020, 11:50 AM IST

परिचारिका ज्या परिस्थिती काम करीत आहेत त्याची जाणीव ठेवून शासनाने आम्हाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी परिचारिका संघटनेने केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर मंगळवारपासून काम बंद करण्याचा इशारा परिचारिका संघटनेने दिला आहे.

amravati nurses agitation  amravati latest news  amravati corona update  अमरावती लेटेस्ट न्यूज  अमरावती कोरोना अपडेट  अमरावती परिचारिका आंदोलन
परिचारिकांचा रोष : सात दिवस काळ्या फिती लावून केले काम; मंगळवारपासून काम बंद!

अमरावती - अल्पशा संख्येत क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची सेवा करणे, वेतन वेळेवर न मिळणे, कोरोग्रस्तांची सेवा करूनही योग्य अधिकार न मिळणे अशा अनेक तक्रारी करत परिचारिकांचे आंदोलन सुरू आहे. गेल्या सात दिवसांपासून काळ्या फिती लावून काम केले असताना आता मंगळवारपासून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, कोविड हॉस्पिटल, जिल्हा स्त्री रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या शहरातील शासकीय रुग्णालयात सेवा देणाऱ्या 400 परिचरिकांसह उपजिल्हा रुग्णालय धारणी, अचलपूर, ग्रामीण रुग्णालय भस्टकुळीसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिका 1 सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम करीत आहेत. सध्या कोरोनामुळे काम वाढले आहे. त्यामुळे परिचरिकांवर ताण वाढला आहे. चार रुग्णांमगे एक परिचारिका हवी असताना जिल्ह्यात 100 रुग्णांमगे एक परिचारिका आहे. शासनाने परिचरिकांची भरती करावी, अशी आमची मागणी असल्याचे परिचारिका संघटनेच्या पदाधिकारी उषा दहिकार यांनी सांगितले.

2005 नंतर नियुक्त परिचरिकानं पेन्शन मिळायला हवी. आमदार, खासदारांना पेन्शन लागू असताना आम्हाला पेन्शन का नाही? असा सवाल परिचारिका संघटनेने केला आहे. परिचरिकांच्या पदोन्नतीचा प्रश्नही अनेक वर्षांपासून रखडला आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालयात परिचारिकेचे पद निर्माण करावे. केंद्र शासनाप्रमाणे परिचारिकांना वेतन आणि भत्ते मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिचारिकांचे वेतन नियमित केले जात नाही. शासनाने 1 तारखेलाच परिचरिकांना वेतन द्यावे. परिचारिका ज्या परिस्थिती काम करीत आहेत त्याची जाणीव ठेवून शासनाने आम्हाला योग्य न्याय द्यावा, अशी मागणी परिचारिका संघटनेने केली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत शासनाने योग्य निर्णय घेतला नाही तर मंगळवारपासून काम बंद करण्याचा इशारा परिचारिका संघटनेने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.