अमरावती - राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला असला, तरी अमरावती जिल्ह्यात कुठेच सध्या बर्ड फ्लूचा कुठलाही धोका नसून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने नागरिकांना केले आहे. तसेच पोल्ट्री व्यावसायिकानीं स्वच्छता पाळावी व नागरिकांनाही अंडे चिकन खाणे बंद करू नये, असेही पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण -
देशात चार राज्यात बर्ड फ्लू आल्याची चर्चा असतानाच परभणी जिल्ह्यात ९०० कोंबड्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या कोंबड्याचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याने समोर आले आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्यातच काल बडनेरा येथील ४० कोंबड्याचा अचानक मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु त्या कोंबड्याचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाला असावा, असे कुठलेही लक्षण नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अमरावतीत सध्या बर्ड फ्लूचा कुठलाही धोका नसून नागरिकांनी बिनधास्तपणे चिकन, अंडे खावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
म्हणून चिकन अंड्याचे दर खाली -
बर्ड फ्लू संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे अंड्याची आणि चिकनची मागणी घटली आहे. त्यामुळे चिकनचे दरही कमी झाले आहे. तसेच पोल्ट्री व्यवसायिकांनी एका पोल्ट्री फॉर्ममधून दुसऱ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये जाऊ नये. कॉस्टिक सोड्याची फवारणी करावी. तसेच मृत पक्षी आढळल्यास ते खोल जमिनीत गाडावे, असा सुचनाही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे यांनी दिल्या आहे.
हेही वाचा - 'नारायण राणेंची सुरक्षा काढली, मग वैभव नाईकांना सुरक्षा कशी?'