अमरावती - अमरावतीतील एक व्यक्ती कुटुंबियांसह मेरठ येथे एका कार्याक्रमानिमित्त गेली होती. त्यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर सध्या मेरठ येथेच उपचार आहे. पण, त्यांसोबत असलेल्या त्यांच्या मुलांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नसल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नसल्याचे जिल्हीधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि घाबरू नका, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मेरठ (उत्तर प्रदेश) येथे गेलेल्या व्यक्तीचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असता तरी अमरावतीत परतलेल्या त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये तसे कोणतेच लक्षण नाही. पण, त्यांना काळजी घेण्याचे सांगितले आहे. तसेच त्या दोघांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली असून त्याचा अहवाल येणे बाकी आहे.
हैदराबादहून आलेल्या व्यक्तीचे विलगिकरण
अमरावतीतील एक व्यक्ती हैदराबाद येथून विमानाने प्रवास करून आला होता. त्या विमानातएक कोरोनाग्रस्त रुग्ण होता. त्यामुळे अमरावतीतील त्या व्यक्तीला विलगिकरणा करण्यात आले आहे. त्याचे स्वॅब तपासणीसाठई घेण्यात आले असून सध्या त्याचा अहवाल आलेला नाही. मात्र, त्यात कोरोनाचे कोणतेही लक्षणे दिसत नसल्याने सध्यातरी तो पॉझिटिव्ह नसल्याचेही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - 'लॉकडाऊन'दरम्यान अमरावतीमध्ये अडकलेल्यांसाठी बेघर निवारा केंद्राचा 'आधार'