ETV Bharat / state

गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा होत नाही, भाजपचा यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार

author img

By

Published : Dec 26, 2020, 3:29 PM IST

Updated : Dec 26, 2020, 3:38 PM IST

नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनत नाही.. सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपत नाही आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलत नाही, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

BJP's Counterattack on Yashomati Thakur
भाजपचा यशोमती ठाकूर यांच्यावर पलटवार

अमरावती - आलूसे कभी सोना नही बनता.. नकली गांधी नाव धारण केल्याने कोणी महात्मा बनत नाही.. सोनिया नाव धारण करून ॲन्टोनीया माईनो यांचे वास्तव लपत नाही आणि केवळ भारतीय वेष परिधान केल्याने इटालियन मानसिकता बदलत नाही, हे गांधी घराण्याची गुलामगिरी करणाऱ्या महिला व बालकल्याण मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी ध्यानात घ्यावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

यशोमती ठाकूर यांनी मोदींवर केली होती टीका -

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवली म्हणजे ते टागोर होऊ शकत नाहीl, अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली होती. यशोमती ठाकूर यांची ही टीका भाजप कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते काँग्रेसवर टीका करताना शिवराय कुळकर्णी
भाजपकडून रॉबर्ट वाड्रा टार्गेट -शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणाऱ्या आणि प्रियंका रॉबर्ट वाड्रा यांच्या तिजोऱ्या भरणाऱ्या काँग्रेसी गुलामांनी शेतकरीहिताचा पुळका दाखवू नये. काँग्रेसच्या सत्ताकाळात रॉबर्ट वाड्रा यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी गिळल्याचा इतिहास ताजा आहे. काँग्रेसने नाहक पुतनामावशीचे प्रेम दाखवू नये. जो पक्ष एका घराण्याच्या गुलामगिरीच्या आणि चाटूगिरीच्या मानसिकतेत अडकला आहे, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. स्वतःचेच तोंड स्वतःच्याच थुक्याने मलिन करण्याचा प्रकार असल्याची टीकाही शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. यशोमती ठाकूर यांनी महिला अत्याचारावर आळा घालून दाखवावा -दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर मुक्ताफळे उधळली आहेत. गांधी घराण्याशी आपण किती एकनिष्ठ आहोत, हे दर्शवण्याची स्पर्धा कॉंग्रेसजनांमध्ये कायम सुरू असते. त्यात यशोमती ठाकूर कायम आघाडीवर असतात. मोदींवर टीका करून काँग्रेसमध्ये आणखी वरचे पद मिळते, या अनुभवातून यशोमती ठाकूर आपल्या मंत्रीपदाची चुणूक दाखवण्याऐवजी रोज नित्यनेमाने मोदींवर शाब्दिक हल्ला चढवत असतात. सोनिया, राहुल आणि प्रियंका यांचा इतिहास आम्हाला पुन्हा उगाळायला लावू नका. स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि सर्वांना कर्जमाफीचा लाभही नाही. राज्यात रोज सर्वत्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. यशोमती ठाकूर यांनी प्रथम त्यावर लक्ष द्यावे. त्यांनी प्रथम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या व राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या समस्या सोडवून दाखवाव्या, असे आव्हान शिवराय कुळकर्णी यांनी दिले आहे.

जिल्ह्यात पालकमंत्री आणि भाजपात शीतयुद्ध -

विविध विषयावरून जिल्ह्यात भाजप आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात शीतयुद्ध रंगले आहे. यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान किंवा भाजपवर टीका करताच भाजपकडून त्यांना तितकेच बोचरे प्रत्युत्तर दिले जाते.

Last Updated : Dec 26, 2020, 3:38 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.