ETV Bharat / state

अमरावतीत पेट्रोल पंपावर "नो मास्क नो पेट्रोल" मोहीम - कोरोना बातमी

पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला येणारे नागरिक हे शहरासह अनेक ग्रामीण भागातून येतात. त्यांचा संपर्क हा पेट्रोल देणाऱ्या व्यक्तीशी होतो. पेट्रोल देणाऱ्या व्यक्तीच्या संपर्क हा हजारो वाहन चालकांशी होतो. त्यामुळे कोरोनाचा धोका जास्त निर्माण होतो. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी नो मास्क नो पेट्रोल ही मोहीम राबवत असल्याचे पेट्रोल चालकांनी सांगितले आहे.

amravati
नो मास्क नो पेट्रोल
author img

By

Published : Mar 6, 2021, 12:27 PM IST

अमरावती: जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याची साखळी तोडण्यासाठी अमरावतीत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यात आता महत्त्वाचा निर्णय पेट्रोलियम युनियन आणि जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी आता अमरावती शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर नो मास्क नो पेट्रोल ही मोहीम राबवली जात आहे. जे ग्राहक मास्क लावत नाही अशा वाहन धारकांना पेट्रोल दिले जात नाही. जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासूनच आम्ही ही मोहीम राबवत असल्याचं पेट्रोल पंप मालकांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.