ETV Bharat / state

अमरावतीत रस्त्यावर भरदिवसा गर्दी, नागरिकांचा रात्रीही मुक्त संचार - night curfew in amravati

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अमरावती शहरात मात्र कुठलाही धाक नसल्याप्रमाणे रस्त्यावर नागरिक मुक्तपणे संचार करीत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी ओसरायचे नाव घेत नसल्याने हा कसला लॉकडाऊन हा प्रश्न निर्माण होत आहे.

अमरावतीत रस्त्यांवर गर्दी
अमरावतीत रस्त्यांवर गर्दी
author img

By

Published : Apr 18, 2021, 8:02 PM IST

अमरावती - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अमरावती शहरात मात्र कुठलाही धाक नसल्याप्रमाणे रस्त्यावर नागरिक मुक्तपणे संचार करीत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दी ओसरायचे नाव घेत नसल्याने हा कसला लॉकडाऊन हा प्रश्न निर्माण होत आहे.

नागरिकांचा रात्रीही मुक्त संचार
धाक नसल्याचा परिणाम....

कोरोनाच्या या संकट काळात भाजी, औषधी, दूध या अत्यावश्यक सेवांसाठी नागरिकांना बाहेर पडण्याची मुभा आहे. मात्र, दिवसभर कुणाचाही धाक नसल्याचा परिणाम जाणवत आहे. भाजी खरेदी करणाऱ्यांपेक्षा विक्रेत्यांची गर्दी जास्त दिसून येत आहे. अतिशय गजबजलेल्या पंचवटी चौकापासून ते भाजी विक्रेत्यांनी फूटपाथवर दुकान थाटली आहेत. गडगेनगर, शेगावनाका ते अगदी कठोरा नाका अशी एकूण 3 किमी पर्यंत भाजी विक्रेते रस्त्यावर आहेत. असेच चित्र फरशी स्टॉप, दस्तुर नगर आणि यशोदगर नगर परिसरातही आहे. साई नगर, चपराशीपुरा आणि बियाणी चौकातही हेच दिसून आले. पोलिसांची ड्युटी मुख्य चौकात दिवसभर लावण्यात आली आहे.

नागरिक मोकळेपणाने फिरताना
नागरिक मोकळेपणाने फिरताना

विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई...

सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस जास्त कारवाई करत आहेत. दिवसा कुणावरही विशेष कारवाई केली जात नसल्याने रस्त्यावर बिनधास्त गर्दी वाढलेली दिसते. शहरात दोन पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त, 67 पोलिस अधिकारी, 1420 पोलीस कर्मचारी आणि 250 होमगार्ड तैनात केले आहेत. 1 ते 16 एप्रिल या कालावधीत अमरावतीत कोरोनामुळे 83 बळी गेले आहेत. हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास जागा उपलब्ध नाही. एका मृतांच्या कुटुंबियांना सुमारे 3 ते 4 तास वाट पहावी लागत आहे. तर स्मशानालगत खुल्या मैदानावरही मृतदेहांवर अंत्यविधी करण्याची वेळ आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.