ETV Bharat / state

नेत्रदान दिन : अमरावतीत लवकरच सुरू होणार नेत्रपेढी - नेत्रदान दिन 2021

आज नेत्रदान दिन आहे. यानिमित्ताने अमरावती जिल्हा सामान्य रुगणलायत नेत्र विभागात नेत्रपेढी सज्ज होत आहे. महिन्याभरात ही नेत्रपेढी सुरू होणार आहे.

अमरावती
अमरावती
author img

By

Published : Jun 10, 2021, 5:39 PM IST

अमरावती - जिल्हा सामान्य रुगणलायत नेत्र विभागात नेत्रपेढी सज्ज होत आहे. महिन्याभरात ही नेत्रपेढी सुरू होणार आहे. आज जागतिक नेत्रदान दिनाच्या औचित्याला जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नेत्र विभागाला भेट दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ही नेत्रपेढी अमरावती जिल्ह्यात अंधत्व निवारणासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. दृष्टिदान चळवळ व्हावी यासाठी नागरिकांनी नेत्रदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकऱ्यांनी केले आहे.

अमरावती जिल्हाधिकारी शैलेश नवाल

नेत्रपेढी सज्ज

जिल्हा सामान्य रुग्णलयातील नेत्र विभागात अत्याधुनिक उपकरणांनी नेत्रपेढी सज्ज झाली आहे. याठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंध व्यक्तीला नेत्र बसवण्यासाठी सर्व सोयींनी युक्त असे शस्त्रक्रिया कक्ष तयार आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मोतिबिंदूवर शस्त्रक्रिया केली जाते. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नम्रता सोनोने, डॉ. कुणाल वानखडे यांच्यासह नेत्र समुपदेशक निलेश ढेंगळे या ठिकाणी काम पाहत आहेत.

उद्या अकोल्याचे पथक करणार पाहणी

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नेत्रपेढीच्या तयारीची संपूर्ण माहिती यावेळी घेतली. उद्या (11 जून) अकोला येथून आरोग्य विभागाचे खास पथक या नेत्रपेढीची पाहणी करण्यासाठी येणार आहे. त्यांच्या पाहणीनंतर ही नेत्रपेढी सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

डोळ्याला पट्ट्या बांधून अंधत्वाचा अनुभव

शहरात अनेक वर्षांपासून नेत्रदान चळवळ राबविणाऱ्या हरिना नेत्रदान समितीच्यावतीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागासमोर 5 मिनिटं डोळ्यावर पट्टी बांधून अंधत्वाचा अनुभव घेण्यात आला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही डोळे बंद करून या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी सिने कलावंत शशांक उदापुरे, चंद्रकांत पोपट, मोनिका उमप आदी उपस्थित होते.

हेही वाचा - नवी मुंबई विमानतळ नावाचा वाद; स्थानिकांची दिबा पाटलांच्या नावाची मागणी, तर शिवसेना बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.