अमरावती - वर्धा नदीत बोट बुडाल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेतील 10 जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. मात्र, या दरम्यान मृतकांपैकी एका दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले असल्याची माहिती पुढे आहे. अतुल वाघमारे (25) व वैशाली अतुल वाघमारे (19), अशी या दाम्पत्याची नावे असून अवघ्या 22 दिवसांत त्यांच्या सुखी संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
वर्धा नदीतील बोट अपघातात दोघांचा मृत्यू -
अतुल वाघमारे याचे ऑगस्ट महिन्यांत २२ तारखेला अमरावतीच्या वरुड तालुक्यातील गाळेगाव येथील वैशाली मटारे या तरुणीशी लग्न झाले. दोघांनी आयुष्यभर एकमेकांच्या सुख-दुखात साथ देण्याचे वचन एकमेकांना दिले. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. मात्र, ते नियतीला मान्य नव्हते. 14 सप्टेंबर रोजी वरुडच्या झुंज येथील वर्धा नदीतील बोट अपघातात दोघांचा मृत्यू झाला. आज पहाटेच त्यांचे मृतहेद हाती लागले आहे.
महादेवाच्या दर्शनासाठी जाताना झाला होता अपघात -
दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हे सर्व लोक अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील होते. या घटनेतील 10 मृतदेह सापडले असून असून उर्वरित एका जणांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे 11 जण एकाच कुटुंबातील हे गाडेगाव येथील मते कुटुंबियांकडे दशक्रिया विधीसाठी गेले होते. दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र, अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले.
हेही वाचा - वर्धा नदी बोट दुर्घटना, 11 पैकी 10 जणांचे मृतदेह सापडले