ETV Bharat / state

नवव्या दिवशीच आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहितेची आत्महत्या, कारण अस्पष्ट - कारण

अमरावतीमध्ये नऊ दिवसापूर्वीच आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

नवव्या दिवशीच आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहितेची आत्महत्या, कारण अस्पष्ट
author img

By

Published : Apr 25, 2019, 11:11 PM IST

अमरावती - नऊ दिवसापूर्वीच आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आज (गुरुवारी) दुपारी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाणकापूर येथे ही घटना घडली. नवविवाहित तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अश्विनी प्रमोद चवरे (वय २३) असे मृत नवविवाहितेचे नाव आहे.

आई-वडील नसलेल्या अश्विनी व प्रमोद चवरे यांचा १७ एप्रिलला विवाह झाला होता. दोघांचीही आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने प्रमोदच्या गावी दोघांनी आंतरजातीय विवाह केला होता. त्यांनी चिंचोली जाणकापूर येथील मंदिरात विवाह केला होता. तर आज दुपारी घरी कोणी नसताना अश्विनीने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला.

Intro:आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवविवाहित तरुणीची विवाहाच्या नंतर नऊ दिवसातच आत्महत्या.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील धक्कादायक घटना.
-----------------------------------------
अमरावती अँकर
मागील नऊ दिवसापूर्वी प् आंतरजातीय विवाह केलेल्या नवविवाहितेने गळफास घेऊन घरीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी दुपारी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या जाणकापूर येथे घडली.नवविवाहित तरुणीनीने केलेल्या आत्महत्येमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे

अश्विनी प्रमोद चवरे वय २३ वर्ष असे मृतक नवविवाहितेचे नाव आहे, आई वडील नसलेल्या अश्विनी व प्रमोद ची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने प्रमोद च्या गावीच दोघांचा आंतरजातीय विवाह चिंचोली जाणकापूर येथील मंदिरात १७ एप्रिल रोजी झाला होता, आज दुपारी घरी कोणी नसतांना तिने गळफास घेतला,मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला,पोलिसांनी सध्या मर्ग दाखल केला असून
घटनेचा अधिक तपास मंगरूळ दस्तगिर चे पोलीस उपनिरीक्षक एस व्ही. ठावरे करीत आहे,Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.