अमरावती : नवीन अमरावती रेल्वे स्थानकांचा रेल्वे स्थानकांचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. या स्ठानकाला आता पिंक रेल्वे स्थानक म्हणून घोषित करण्यात आले आहे. या नवीन अमरावती रेल्वे स्थानकाचा कारभार महिलांच्या हाती आला आहे. फक्त अमरावतीकरांसाठीच नव्हे, तर राज्यासाठी ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
गुलाबी झाले सर्व : या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना लागणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधा, रेल्वे गाड्यांचे आरक्षण, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, संगणक कक्ष, पार्सल सुविधा,स्टेशन प्रबंधक, तिकीट निरीक्षक, सफाई कर्मचारी, विश्रामगृहाचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्था यासह नवीन अमरावतीचे रेल्वे स्थानक पिंक करण्याची म्हणजे यात अजून महिला कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. रेल्वे स्टेशनच्या इमारतींना संपूर्ण गुलाबी रंग देण्यात आला आहे. इतकेच काय तर स्टेशनवर लावण्यात आलेल्या पंखेसुद्धा गुलाबी रंगाचे लावण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अनुषंगाने अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकाला पिंक स्टेशन घोषित करण्यात आले.
रेल्वे स्थानकावर महिला 'राज' : अमृत भारत योजनेंतर्गत रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास केला जात आहे. भुसावळ मध्यरेल्वे विभागांतर्गत नवीन अमरावती येथील रेल्वे स्थानक आणि नागपूर रेल्वे विभागांतर्गत अजनी रेल्वे स्थानक पिंक स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे 'न्यू अमरावती' (नवी अमरावती)पहिले गुलाबी स्थानक झाले आहे. या स्टेशनाचा कारभार ५ ऑगस्टपासून महिलांच्या हाती देण्यात आला आहे.
'महिला राज'चे तिसरे रेल्वे स्थानक : मध्यरेल्वेने महिला महिला सशक्तिकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यानुसार भुसावळ विभागातील अमरावती रेल्वे स्टेशनाचे व्यवस्थापन महिला करणार आहेत. भुसावळ विभागातील महिला कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थापित केले जाणारे मध्य रेल्वेचे हे तिसरे स्थानक ठरले आहे. महिलांना समान संधी उपलब्ध देण्यात मध्य रेल्वे विभाग नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मुंबई माटुंगा स्थानक आणि त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक हे महिलांकडून व्यवस्थापित करण्यात येते. महिलांकडून व्यवस्थापित करण्यात येणारे हे भारतीय रेल्वेचे पहिले झोन असल्याचा मान आहे.
हेही वाचा-