नवी दिल्ली - खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे सांगत न्यायालयाने राणांना 2 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया दिली. मी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
'या मागे काहीतरी राजकीय खिचडी शिजत आहे' -
मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणप रद्द केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. मी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या मागे काहीतरी राजकीय खिचडी शिजत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी व्ययक्तीक बोलायचे असल्याने त्यांनी ही संधी शोधली असल्याचे त्यांनी म्हटले.
आनंदराव अडसूळ यांच्यावतीने दाखल केली होती याचिका -
2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत राणा यांनी अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार आणि तत्कालीन अमरावतीचे खसदर आनंदराव अडसूळ यांच्यावतीने त्यांचे स्वीय सचिव सुनील भालेराव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे आल्याचे म्हटले होते. 2014 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाला होता मात्र त्यांच्या जात वैधतेचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. 2019 मध्ये मात्र या अवैध जात प्रमाणपत्राच्या आधारावरच नवनीत राणा यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या.
नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात -
खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे आल्याचे सिद्ध झाल्याने आता नवनीत राणा यांची खासदारक रद्द होणार असे बोलले जात आहे. त्यामुळे पोट निवडणूक घेण्यासाठी अडसूळ यांना वेगळी याचिका उच्च न्यायालयात दाखल करावी लागणार आहे. या ,प्रकरणामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे.
हेही वाचा - पुणे आग दुर्घटना : परिस्थिती अजूनही आटोक्यात नाही; घटनास्थळावरुन 'ईटीव्ही भारत'चा आढावा