ETV Bharat / state

अमरावती मतदारसंघाचे विश्लेषण : मोदी लाटेवर वरचढ ठरली नवनीत राणांची मेहनत - anandrao adusl

निवडणुकीच्या रणधुमाळी नंतर २३ मे रोजी नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आणि पाचव्या फेरीपर्यंत अडसुळांनी १२ हजार मतांची आघाडी घेतली. सहाव्या फेरीत मात्र चित्र बदलले. नवनीत राणा या १० हजराच्यावर मतांनी समोर निघाल्या. यानंतर अखेरच्या १८ व्या फेरीपर्यंत नवनीत राणा यांच्या मतांची आघाडी कायम होती.

मोदी लाटेवर वरचढ ठरली नवनीत राणांची मेहनत
author img

By

Published : May 24, 2019, 10:26 PM IST

अमरावती - लोकसभा निवडणुकीचा कल पाहता देशात मोदी लाट कायम असल्याचे स्पष्टपणे दिसले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात मात्र नवनीत राणा यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ही मोदी लाटेवरही वरचढ ठरली आहे. सलग पाच वेळा खासदार राहिलेले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे राज्य मंत्री राहिलेले शिवसेनेचे गटनेता राहिलेले आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी ३६ हजार ९५१ हजार मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे गत २५ वर्षांपासूनचा गड असणाऱ्या अमरावतीत नवा चौथ्या महिला खासदार होण्याचा इतिहासही रचला आहे.

मोदी लाटेवर वरचढ ठरली नवनीत राणांची मेहनत

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा २००९ च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत पाय रोवले. शिवसेनेचे मोठे नेते, माजी केंद्रीय राज्य मंत्री अशी प्रतिमा असणाऱ्या आनंदराव अडसुळांना अमरावतीकरांनी लोकसभेतील आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले होते. याच कळत अमरावतीच्या प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती असल्याने अमरावती शहर आणि जिल्ह्याचा कायापालट होत होता. २००९ ते २०१४ या काळात अडसुळांच्या कार्यावर मतदार हवे तसे संतुष्ट नव्हते. अडसुळांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सारा विश्वास हा त्यांनी त्यांच्यासोबत जिल्हा बाहेरून आणलेल्या कार्यकर्त्यांवरच अधिक होता.

अडसूळ खासदार होताच दर्यापूर या अनुसुचित जातीसाठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदार संघातून त्यांनी पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली, निवडूनही आणले. जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी खासदार आनंत गुढे, शिवसेनेचे त्यावेळी असणारे जिल्हाप्रमुख सोमेश्वर पुसदकर, शहरप्रमुख दिनेश बूब यांचे अडसुळांनी पक्षातील महत्व अलगद कमी केले. २०१४ च्या निवडणुकीत बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्याविरोधात निवडणूक लढविली. त्यावेळी मोदी लाट देशभर होती आणि मोदींची सभा अमरावतीत झाल्यामुळे अडसुळांना अनपेक्षित असा विजय मिळाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूरातून अभिजित अडसूळ पराभूत झाल्यावर अमरावतीत जिल्ह्यात आठ पैकी एकही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला यश आले नाही.
दरम्यान २०१४ ची निवडणूक पराभूत होताच नवनीत राणा यांनी मोठ्या जोमाने २०१९ ची तयारी सुरू केली, त्यांची तुटकी- फुटकी मराठी भाषा समृद्ध केली. मेळघाटातील दुर्गम, अती दुर्गम गावणपर्यंत जनसंपर्क वाढविला. लहान मोठ्या सर्व कार्यक्रमान हजर राहणे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे असा सलग पाच वर्षाचा दिनक्रम नवनीत राणा यांचा होता. यावेळी अडसुळांनी अमरावतीती शिवसेनेचे पार वाटोळे करण्यास सुरवात केली होती. ज्यांचा शिवसेनेशी तिळमात्र संबंध नाही अशांना थेट शहरप्रमुख, जिल्हा प्रमुख अशी पद मिळायला लागल्याने सच्चे शिवसैनिक दुखावले गेले. अडसूळ हे अमरावतीचे नावालाच खासदार आहेत आणि ते मुंबईतच अधिक राहतात, अशी टीका त्यांच्यावर सतत होत राहिली.
२०१९ ची निवडणूक जाहीर होताच भजोंतील एका मोठया गटाने शिवसेनेला अडसुळांच्या जागी दुसरी व्यक्ती द्या, अशी मागणी रेटली होती. मात्र शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आनंदराव अडसूळ याच्यावर पूर्ण विश्वास होता. निवडणूक रणधुमाळीत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अडसुळांच्या विजयाची धूर आपल्या खांद्यावर घेतली होती. नवनीत राणा यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह न घेता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाइं गटाच्या पाठिंब्यावर स्वतंत्र उमेदवारी दाखल केली. आमदार रवी राणा यांच्या युवस्वाभिमान पक्षाला राज्य स्तरावर मान्यता असून त्यांचे टीव्ही हे बोध चिन्ह आहे. नवनीत राणा यांना टिव्ही हेच बोधचिन्ह मिळेल अशी आशा होती. अडसुळांनी काही जणांना मुद्दाम दलितांची मते खाण्यासाठी उमेदवारी घ्यायला लावून टिव्ही, कॅमेरा, एसी, फळा असे सारखे दिसणारे बोधचिन्ह घ्यायला लावले. योगा योगाने नवनीत राणा यांना टीव्ही हे चिन्ह मिळाले नाही आणि पाना चिन्हावर त्यांनी अमरावती मतदार संघातील जनतेला मते मागितली. 'हर नटो एकही पाना... चुनके लावो नवनीत राणा' अशी कॅचलाईन निवडणूक प्रचारात वापरण्यात आली.

निवडणुकीच्या रणधुमाळी नंतर २३ मे रोजी नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आणि पाचव्या फेरीपर्यंत अडसुळांनी १२ हजार मतांची आघाडी घेतली. सहाव्या फेरीत मात्र चित्र बदलले. नवनीत राणा या १० हजराच्यावर मतांनी समोर निघाल्या. यानंतर अखेरच्या १८ व्या फेरीपर्यंत नवनीत राणा यांच्या मतांची आघाडी कायम होती.
आनंदराव अडसूळ सकाळी अमरावतीत आलेत आणि दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास नागपूरला रवाना होऊन तिथून मुंबई गेलेत असा संदेश खुद्द शिवसैनिकच व्हॅटसअॅपवर वायरल करायला लागलेत. या निवडणुकीत बहुजन वंचित आगडीचे उमेदवार गुणवंत देवपारे आणि बसपाचे अरुण वानखडे दलितांची मते खेचण्यात सपशेल अपयशी ठरले. मुस्लिमांची एक गठ्ठा मते नवनीत रणाच्या पारड्यात गेलीत. निवडणूक काळात शरद पवार यांनी अमरावतीत येऊन नवनीत राणा यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आव्हानला मराठा समाजाने प्रतिसाद दिला. काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनीही नवनीत राणा यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका पार पडली. मतमोजणीचे अखेर चित्र स्पष्ट होताच बडनेरा आणि अचलपूर हे दोन विधानसभा मतदार संघ वगळता अमरावती, तिवसा, मेळघाट आणि दर्यापूर मतदार संघात नवनीत राणा यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. अमरावती विधानसभा मतदार संघात नवनीत राणा यांना ९६ हजार ६४४, अडसुळांना ६८ हजार ८७६, बडनेरा विधानसभा मतदार संघात राणांना ७६ हजार १० अडसुळांना ८६ हजार ४३९, तिवसामध्ये राणांना ७६ हजार ५४७, अडसुळांना ७२ हजार ३२, दर्यापूरमध्ये राणांना ८९ हजरा ७९७, अडसुळांना ७८ हजार ५६२, मेळघाटात नवनीत राणा यांना ९१ हजार ८ तर अडसुळांना ७८ हजार ८५२ आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना ७७ हजार ८३८ आणि अडसुळांना ८५ हजरा ६७८ मते मिळलीत.

नवनीत राणा यांच्या विजयामुळे विधानसभा निवडणुकीत निश्चितच परिणाम दिसणार आहेत. जिल्ह्यात आठही विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा एकही आमदार नाही. आता अडसूळ अमरावतीशी काही संबंध ठेवतील, असे सकरात्मक चिन्ह दिसत नाही. नवनीत राणा यांच्या विजयामुळे रावसाहेब शेखावत यांना पुनः अमरावतीतून निवडून येण्याचे वेध लागले आहेत. डॉ. राजेंद्र गवई यांनाही विधानसभेत दर्यापूर मतदार संघातून आपल्याला जनता निवडून देईल, असे वाटायला लागले आहे. येणाऱ्या काळात अमरावतीच्या राजकारणात बरेच बदल होतील, अशी चिन्ह आहेत.

Intro:गुरुवारी समोर आलेल्या लोकसभा निवडणुकीचा कल पाहता देशात मोदी लाट कायम असल्याचे स्पष्ट झाले असताना अमरावती लोकसभा मतदार संघात मात्र नवनीत राणा यांनी घेतलेली प्रचंड मेहनत ही मोदी लाटेवरही वरचढ ठरली आहे. सलग पाच वेळा खासदार राहिलेले आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे राज्य मंत्री राहिलेले आणि आता लोकसभेत शिवसेनेचे गटनेता म्हणून भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी 36 हजार 951 मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे गत 25 वर्षांपासूनचा गड असणाऱ्या अमरावतीत नवा चौथ्या महिला खासदार होण्याचा इतिहासही रचला आहे.

Body:अमरावती लोळसभा मतदार संघ हा 2009 च्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आनंदराव अडसूळ यांनी अमरावतीत पाय रोवले. शिवसेनेचे मोठे नेते, माजी केंद्रीय राज्य मंत्री अशी प्रतिमा असणाऱ्या आनंदराव अडसुळांना अमरावतीकरांनी लोकसभेतील आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले होते. याच कळत अमरावतीच्या प्रतिभाताई पाटील या देशाच्या राष्ट्रपती असल्याने अमरावती शहर आणि जिल्ह्याचा कायापालट होत होता. 2009 ते 2014 या काळात अडसुळांच्या कार्यावर मतदार हवे तसे संतुष्ट नव्हते. अडसुळांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सारा विश्वास हा त्यांनी त्यांच्यासोबत जिल्हा बाहेरून आणलेल्या कार्यकर्त्यांवरच अधिक होता. अडसूळ खासदार होताच दर्यापूर या अनुसुचिय जातीसाठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदार संघातून त्यांनी पुत्र अभिजीत अडसूळ यांना उमेदवारी दिली निवडूनही आणलं हा प्रकार सजीवसैनिकाना खरा तर रुजला नाही. जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी खासदार आनंत गुढे, शिवसेनेचे त्यावेळी असणारे जिल्ज प्रमुख सोमेश्वर पुसदकर, शहर प्रमुख दिनेश बूब यांचे अडसुळांनी पक्षातील महत्व अलगद कमी केले. 2014 च्या निबंडणुकीत बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यावेळी मोदी लाट देशभर होती आणि मोदींची सभा अमरावतीत झाल्यामुळे अडसुळांना अनपेक्षीत असा विजय मिळाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत दर्यापूरातून अभिजित अडसूळ पराभूत झाल्यावर अमरावतीत जिल्ह्यात आठ पैकी एकही विधानसभा मतदार संघात शिवसेनेला यश आले नाही.
दरम्यान 2014 ची निवडणूक पराभूत होताच नवनीत राणा यांनी मोठ्या जोमाने 2019 ची तयारी सुरू कर्ली. त्यांची तुटकी फुटकी मराठी भाषा समृद्ध केली. मेळघाटातील दुर्गम, अती दुर्गम गावणपर्यंत जनसंपर्क वाढविला. लहान मोठ्या सर्व कार्यक्रमान हजर राहणे, सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे असा सलग पाच वर्षाचा दिनक्रम नवनीत राणा यांचा होता. यावेळी अडसुळांनी अमरावतीती शिवसेनेचे पार वाटोळे करण्यास सुरवात केली होती. ज्यांचा शिवसेनेशी तिळमात्र संबंध नाही अशांना थेट शहरप्रमुख, जिल्हा प्रमुख अशी पद मिळायला लागल्याने सच्चे शिवसैनिक दुखावले गेले. अडसूळ हे अमरावतीचे नावालाच खासदार आहेत आणि ते मुंबईतच अधिक राहतात अशी टीका त्यांच्यावर सतत होत राहिली.
२०१९ ची निबंडणूक जाहीर होताच भजोंतील एका मोठया गटाने शिवसेनेला अडसुळांच्या जागी दुसरी व्यक्ती द्या अशी मागणी रेटली होती. मात्र शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आनंदराव अडसूळ याच्यावर पूर्ण विश्वास होता. निवडणूक रणधुमाळीत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अडसुळांच्या विजयाची धूर आपल्या खांद्यावर घेतली होती. नवनीत राणा यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह न घेता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस रिपाइं गटाच्या पाठिंब्यावर स्वतंत्र उमेदवारी दाखल केली. आमदार रवी राणा यांच्या युवस्वाभिमान पक्षाला राज्य स्तरावर मान्यता असून त्यांचे टीव्ही हे बोध चिन्ह आहे. नवनीत राणा यांना टिव्ही हेच बोधचिन्ह मिळेल अशी आशा होती. अडसुळांनी काही जणांना मुद्दाम दलितांची मतं खाण्यासाठी उमेदवारी घ्यायला लावून टिव्ही, कॅमेरा, एसी, फळा असे सारखे दिसणारे बोधचिन्ह घ्यायला लावले. योगा योगाने नवनीत राणा यांना टीव्ही हे चिन्ह मिळाले नाही आणि पाना चिन्हावर त्यांनी अमरावती मतदार संघातील जनतेला मतं माघीतली.' हर नटो एकही पाना चुनके लावो नवनीत राणा' अशी कॅचलाईन निबंडणूक प्रचारात वापरण्यात आली.
निवडणुकीच्या रणधुमाळी नंतर 23 मे रोजी नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आणि पाचव्या फेरीपर्यंत अडसुळांनी 12 हजार मतांची आघाडी घेतली. सहाव्या फेरीत मात्र चित्र बदललं.नवनीत राणा या 10 हजराच्या वर मतांनी समोर निघाल्या. यानंतर अखेरच्या 18 व्या फेरीपर्यंत नवनीत राणा यांच्या मतांची आघाडी कायम होती.
आनंदराव अडसूळ सकाळी अमरावतीत आलेत आणि दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास नागपूरला रवाना होऊन तिथून मुंबई गेलेत असा संदेश खुद्द शिवसैनिकच व्हॅटसअप्पवर वायरल करायला लागलेत.
या निवडणुकीत बहुजन वंचित आगडीचे उमेदवार गुणवंत देवपारे आणि बसपाचे अरुण वानखडे दलितांची मतं खेचण्यात सपशेल ओयशी ठरले. मुस्लिमांची एक गठ्ठा मतं नवनीत रणाच्या पारड्यात गेलीत. निवडणूक काकात शरद पवार यांनी अमरावतीत येऊन नवनीत राणा यांच्या पाठीशी उभे राहण्याचा आव्हानला मराठा समाजाने प्रतिसाद दिला.काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनीही नवनीत राणा यांच्या विजयासाठी महत्वाची भूमिका पार पडली.
मतमोजणीचे अखेर चित्र स्पष्ट होताच बडनेरा आणि अचलपूर हे दोन विधानसभा मतदार संघ वगळता अमरावती, तिवसा, मेळघाट आणि दर्यापूर मतदार संघात नवनीत राणा यांनी मोठी आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. अमरावती विधानसभा मतदार संघात नवनीत राणा यांना 96644, अडसुळांना 68876, बडनेरा विधानसभा मतदार संघात रणांना 76010 अडसुळांना 86439, तिवसामध्ये राणांना 76547, अडसुळांना 72032, दर्यापूरमध्ये रानांना 89797, अडसुळांना 78562, मेळघाटात नवनीत राणा यांना 91008 तर अडसुळांना 78852 आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना 77838 आणि अडसुळांना 85678 मतं मिळलीत.
नवनीत राणा यांच्या विजयामुळे विधानसभा निवडणुकीत निश्चितच परिणाम दिसणार आहेत. जिल्ह्यात आठही विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा एकही आमदार नाही. आता अडसूळ अमरावतीशी काही संबंध ठेवतील असे सकरात्मक चिन्ह दिसत नाही. जुन्या शिवसैनीकांमध्ये आठ चार सहा महिन्यात नावचैत्य निर्माण होण्याची आशा धूसर आहे. नवनीत राणा यांच्या विजयामुळे रावसाहेब शेखावत यांना पुनः अमरावतीतून निवडून येण्याचे वेध लागले आहेत.डॉ. राजेंद्र गवई यांनाही विधानसभेत दर्यापूर मतदार संघातून आपल्याला जनता निवडून देईल असे वाटायला लागले आहे. येणाऱ्या काळात अमरावतीच्या राजकारणात बरेच बदल होतील अशी चिन्ह आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.