अमरावती Navneet Rana Opinion : मानसिक रुग्णांवर देशात आग्रा येथे अतिशय चांगल्या पद्धतीनं इलाज केला जातो. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आग्रा येथेच उपचार करणं गरजेचं आहे. (Psychiatrist) आमदार रवी राणा हे जितेंद्र आव्हाड यांना आग्य्राला जाण्यासाठी तिकीट काढून देतील. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी आमदार रवी राणा यांना कॉल करावा, असं देखील खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. (MLA Ravi Rana)
माझ्या उमेदवारीबाबत रवी राणा घेणार निर्णय : 2014 मध्ये देशात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर आमदार रवी राणा यांनी त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. 2019 मध्ये देखील आमदार रवी राणा यांच्यासह खासदार म्हणून मी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. महायुतीमध्ये इतर घटक पक्षांप्रमाणे आम्ही देखील सहभागी आहोत. 2019 मध्ये मी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. आता देखील माझ्या उमेदवारी संदर्भात आमदार रवी राणा हेच निर्णय घेतील असं खासदार नवनीत राणा बोलल्या.
विरोधकही मला उमेदवारी देण्यास तयार, याचा आनंद : 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी मला विरोध केला आज तेच मला आपल्या पक्षाची उमेदवारी देण्यासाठी तयार आहेत. याचा खरंतर आनंद होतो आहे. माझ्या मतदारसंघात मी अनेक विकास कामं केली आहेत. जिल्ह्याचा होत असलेला विकास पाहूनच आज अनेक आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षासह अनेक पक्षांना मी त्यांची उमेदवार व्हावी, असं वाटत असल्याचं देखील खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, मी कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. कालच्या वक्तव्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी खेद व्यक्त करतो. मी कोणत्याही गुन्ह्याला घाबरत नाही. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही. त्याचं विकृतीकरण करणं माझं काम नाही. पण मी काल जे बोललो, ते ओघात बोलून गेलो. प्रभू श्रीराम ज्याला आम्ही महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो. त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की, ते मांसाहारी होते. हा वाद मला आता वाढवायचा नाही. पण जे या विरोधात उभे राहिले आहेत, त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो. वाल्मिकी रामायणात सहा स्कंद आहेत. त्यामध्येही यासंदर्भातील स्पष्ट उल्लेख आढळतो. तो मी वाचून दाखवत नाही. कारण मला वाद वाढवायचा नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय.
हेही वाचा: