ETV Bharat / state

Navneet Rana : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल! खासदार राणांचे पंतप्रधानांना निमंत्रण - Melghat Tiger Reserve Near to Golden jubilee

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सुवर्ण महोत्सवजवळ आला आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेळघाटात येण्याचे निमंत्रण दिले ( Navneet Rana invite PM Modi to Visit Melghat ) आहे. त्याबाबतच पत्र नवनीत राणा यांनी लिहीले आहे.

Navneet Rana
नवनीत राणा
author img

By

Published : Dec 17, 2022, 10:32 AM IST

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेळघाटात येण्याचे निमंत्रण दिले ( Navneet Rana invite PM Modi to Visit Melghat ) आहे. 2023-2024 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची सुवर्ण महोत्सवी वाटचाल सुरू होत ( Melghat Tiger Reserve Near to Golden jubilee ) आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट द्यावी तसेच मेघाटातील आदिवासींची भेट घ्यावी अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

मेळघाटात आल्या होत्या इंदिरा गांधी : 1972 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाल्यावर 1974 ला देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या मेळघाट दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर एकही पंतप्रधान मेळघटात आले नाहीत. आता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात साजरा व्हावा (Melghat Tiger Reserve Golden Jubilee ) यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या सोहळ्याचे उद्घाटन व्हावे असे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

मेळघाटची संस्कृती बघायला या : खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या घनदाट मेळघाटच्या ( Melghat Tiger Reserve ) जंगलात वनसंपदा, वन वैभव, वाघांचे अस्तित्व आणि संपूर्ण आदिवासी बहुल भागाची पाहणी करण्यासह आदिवासी संस्कृती परंपरा पंतप्रधानांनी जवळून बघावी अशी विनंती देखील खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.