अमरावती - जिल्ह्यातील मेळघाट येथे आगळी वेगळी होळी साजरी करण्यात येते. आज (मंगळवार) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी होळीनिमित्त मेळघाटला भेट दिली. यावेळी आमदार रवी राणा यांनी वाजवलेल्या ढोलकीच्या तालावर नवनीत राणा थिरकल्या. त्यांनी आदिवासी बांधवांसोबत नृत्य केले.
डोंगर दऱ्यात वसलेल्या मेळघाटात पाच दिवस होळी साजरी केली जाते. यावेळी आदिवासी बांधव बासरी व ढोलकीच्या तालावर नृत्य करत असतात. मागील २ दिवसांपासून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघेही मेळघाटात असून आदिवासी बांधवासोबत होळी साजरी करत आहेत. यावेळी नृत्यादरम्यान आदिवासी बांधवांनी विविध प्रकारच्या वेशभूषा करून कोरकू नृत्य करतात. यातच आज आमदार रवी राणा यांनी आपल्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्यासाठी ढोलकी वाजवली. यावेळी खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी बांधवांबरोबर नृत्य केले.
हेही वाचा - ...अन् महिला बालकल्याण मंत्र्यांनी धरला ठेका
हेही वाचा - मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या होळीला सुरुवात, पाच दिवस चालतो उत्सव