ETV Bharat / state

कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे रखडला रेल्वे वॅगन कारखाना; खासदार नवनीत राणा यांचा आरोप

बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे (Navneet Rana on Railway Wagon Factory ) काम रखडले आहे. हा मुद्दा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत उपस्थित केला.

Navneet Rana
खासदार नवनीत राणा
author img

By

Published : Dec 17, 2021, 2:22 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे (Railway Wagon Factory ) काम रखडले आहे. या प्रकल्पासाठी 2018 मध्ये मंजुरी मिळाल्यावर प्रेमको रेल इंडिया इंजिनिअरिंग कंपनीला 163 कोटी रुपयांच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, हे काम पूर्ण झाले नसून संबंधित कंपनीला ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी (Navneet Rana on Railway Wagon Factory ) केली आहे. याबाबत त्यांनी लोकसभेतही मुद्दा उपस्थित करून अमरावती जिल्ह्यात रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना त्वरित उभारावा अशी मागणी केली आहे.

लोकसभेत खासदार नवनीत राणा
2020 पर्यंत होती कामाची मुदत -बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे कंत्राट प्रेमको रेल इंजिनिअरिंग या कलकत्याच्या कंपनीला देण्यात आले होते. 2018 मध्ये कामाला सुरुवात होऊन दोन हजार वीसपर्यंत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होणार होता. मात्र, या कंपनीच्या गलथान कारभारामुळे आणि या कंपनीने नियम धाब्यावर ठेवून केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे ड्रॅगन कारखाना निर्मितीस विलंब होत असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी म्हटले आहे.कंपनीवर व्हावी कारवाई -प्रेमको इंजीनियरिंग कंपनीच्या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करून त्यांना दंड ठोठावण्यात यावा, तसेच या कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी थेट लोकसभेत केली आहे. रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यासाठी केंद्र शासनाकडून मिळालेला निधी या कंपनीने मनमानीपणे वापरला असून मनमर्जीने काम करणाऱ्या मुजोर कंपनीला आळा बसावा, अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना हा उच्च प्रतीचा व्हावा, असे त्या म्हणाल्या. तसेच यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल असा विश्वास देखील खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.