ETV Bharat / state

Valentine Day : राणा दाम्पत्याने कॉफी शॉपमध्ये साजरा केला व्हॅलेंटाईन डे; पाहा व्हिडिओ

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा दाम्पत्याने एका कॉफी शॉपमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला आहे. आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना एका काॅफीशाॅपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. नवनीत राणा कॉफी शॉपमध्ये येताच त्यांनी रवी राणा यांनी गुलाबाचे पुष्प देऊन 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या.

Navneet Rana Celebrated Valentine Day
राणा दाम्पत्याने कॉफी शॉपमध्ये साजरा केला व्हॅलेंटाईन डे
author img

By

Published : Feb 14, 2023, 6:48 PM IST

राणा दाम्पत्याने कॉफी शॉपमध्ये साजरा केला व्हॅलेंटाईन डे

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी अमरावती शहरातील एका कॉफी शॉपमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला. विशेष म्हणजे व्यस्त कार्यक्रमात असताना आमदार रवी राणा यांनी खासदार नवनीत राणा यांना एका कॉफी शॉपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. खासदार नवनीत राणा या कॉफी शॉपमध्ये आल्या तेव्हा आमदार रवी राणा यांनी गुलाबाचे फुल देऊन त्यांना 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा दिल्या.

365 ही दिवस असावेत प्रेमाचे : आपण आपल्या जोडीदारासह घरातील सर्व मंडळी तसेच आपले मित्र यांच्यासोबत प्रेमाने राहायला हवे. वर्षातले 365 ही दिवस हे असेच प्रेमाचे असावे असे खासदार नवनीत राणा व्हॅलेंटाईन डे साजरा करताना म्हणाल्या. मला रवीजींनी कॉल करून अर्जंट काम आहे असे, सांगून या कॉफी शॉपमध्ये बोलावले. मी पहिल्यांदाच अमरावतीत कॅफेमध्ये बसून आम्ही दोघे कॉफी घेत आहे. माझ्यासाठी हे सर्व सरप्राईज आहे. आज लग्नाच्या बारा वर्षानंतर देखील आमचे प्रेम असेच कायम आहे.

प्रत्येकांने प्रेम करावे : प्रत्येकाच्या आयुष्यात असाच बूस्ट करणारा क्षण असायला हवा. प्रेमासोबतच आपल्या भविष्याचा विचार प्रत्येकाने करावा. आपले आई-वडील कुटुंबीय यांचे महत्त्व देखील आपल्या आयुष्यात अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीने तारुण्यात असताना प्रेम करायला हवे मात्र प्रेम हेच सगळं काही आहे, आणि हाच शेवट आहे असे अजिबात मानू नये, असे देखील खासदार नवनीत राणा यावेळी म्हणाल्या.

प्रत्येक दिवस असावा व्हॅलेंटाईन : प्रेमाचा असा एकच दिवस नसतो. तर, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असावा असे आमदार रवी राणा व्हॅलेंटाईन डे साजरा करताना म्हणाले . आज सकाळी आम्ही दोघांनीही घरी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर एका मंदिरात गेलो. त्या ठिकाणी अनेक महिला होत्या त्यांची इच्छा होती की आम्ही त्यांच्यासोबत जेवायला हवs. आम्ही देखील त्यांच्यासोबत खाली बसून जेवण घेतले. आपल्या जोडीदाराला प्रेमाचा सन्मान हा दिलाच पाहिजे. आज मी नवनीत राणा यांना कॉफी शॉपमध्ये बोलवून त्यांच्यासोबत कॉफी घेतली. गप्पा मारल्या तसेच गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले. व्हॅलेंटाईन डे मर्यादित राहून आपल्या संस्कृती प्रमाणे साजरा केला तर तो वाईट नाही असे, देखील आमदार रवी राणा म्हणाले.

हेही वाचा - Abdul Sattar On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस बोलतात 'ती' काळ्या दगडावरची पांढरी रेष - अब्दुल सत्तार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.