ETV Bharat / state

वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करावी - मंत्री ठाकूर - Amravati district news

भौतिक प्रगती साधताना पर्यावरणाचे संतुलन राखले गेले पाहिजे. त्यामुळे आपल्या सुंदर वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

पुस्तक प्रकाशन करताना
पुस्तक प्रकाशन करताना
author img

By

Published : Jun 5, 2021, 7:46 PM IST

अमरावती - निसर्गाचे संतुलन ढळले की अनेक अरिष्टे उद्भवतात. भौतिक प्रगती साधताना पर्यावरणाचे संतुलन राखले गेले पाहिजे. त्यामुळे आपल्या सुंदर वसुंधरेप्रती कृतज्ञता बाळगून निसर्गाची जोपासना करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज (दि. 5 जून) येथे केले.

पुस्तक प्रकाशन करताना
बियाणे किटचे वाटप करताना

वृक्षधन पुस्तकाचे प्रकाशन

सेवानिवृत्त वनकर्मचारी संघातर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माजी वनाधिकारी विजय भोसले यांच्या 'वृक्षधन' पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

'वृक्षधन' हा मोलाचा दस्तऐवज

वनांमधील विविध वृक्ष, वनस्पतींची शास्त्रीय व उपयुक्त माहिती 'वृक्षधन' पुस्तकात समाविष्ट असून, माजी वनाधिकारी दिवंगत विजय भोसले यांनी आपला दीर्घ अनुभव, निसर्गाप्रतीचे प्रेम व जिज्ञासेद्वारे परिश्रमपूर्वक हा ग्रंथ सिद्ध केला आहे. वनसंपदा व जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा ग्रंथ मोलाचा दस्तऐवज आहे. नव्या पिढीत पर्यावरणाप्रती आस्था जागविणे, पर्यावरणाचे महत्त्व तरुणाईच्या मनावर बिंबवणे यासाठी दिवंगत भोसले यांचे पुस्तक उपयुक्त ठरेल, असे यशोमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

बियाणे किटचे वाटप

वनविभागातर्फे वृक्षसंवर्धनाअंतर्गत शेवगा झाडाच्या बियाणे कीटचे वाटप विविध गावांचे सरपंच व ग्रामसेवक यांना यावेळी करण्यात आले. पार्डीच्या सरपंच वर्षाताई वानखडे, उपसरपंच प्रवीण ठवळी, वणी ममदापुरचे सरपंच पुनसे ग्रामसेवक डंबाळे, दिवाणखेडचे सरपंच खताळे, इंगोले, नांदगावपेठ येथील जावेद इक्बाल, मार्डा येथील ज्ञानेश्वर गावंडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा - बालकाच्या पोटावर चटके देणाऱ्या आजीविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.