ETV Bharat / state

Nagar Panchayat Elections 2022 : अमरावतीच्या तिवसा नगरपंचायतवर काँग्रेसचे तर भातकुली नगरपंचायतीवर युवा स्वाभिमानचे वर्चस्व - Nagar Panchayat Elections 2022

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायत निवडणुकीचे (Nagar Panchayat Elections 2022) सर्व निकाल हाती आले आहेत. एकूण 17 जागापैकी 12 जागा जिंकून काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत येथे भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी समाधानकारक राहिली असून 4 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे तर वंचितने खाते उघडत 1 जागेवर विजय मिळवला आहे.

Nagar Panchayat Elections 2022
Nagar Panchayat Elections 2022
author img

By

Published : Jan 19, 2022, 3:00 PM IST

Updated : Jan 19, 2022, 3:14 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायत (Nagar Panchayat Elections 2022) निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले आहेत. एकूण 17 जागापैकी 12 जागा जिंकून काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत येथे भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेची कामगिरी समाधानकारक राहिली असून 4 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे तर वंचितने खाते उघडत 1 जागेवर विजय मिळवला आहे. तिवसा मधील या निकालाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बळ मिळाले आहे.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री यशोमती ठाकूर
नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली. अवघ्या एक तासात 17 जागांचे निकाल हाती आले. त्यात 12 जागा जिंकून काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले असून गेल्या निवडणुकीपेक्षा 2 जागा जास्त जिंकल्या आहेत. शिवसेनेला 4 जागा तर वंचित बहुजन आघाडीला 1 जागेवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे भाजपाला येथे आपले खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच स्थिती आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू केला आहे.
भातकुलीत युवा स्वाभिमानच्या आमदार रवी राणा यांचे वर्चस्व कायम..
तिवसा बरोबरच भातकुली नगरपंचायतच्या 17 जागेचे निकाल हाती आले आहे. यामध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या 9 जागा विजयी झाल्याने रवी राणा यांचे वर्चस्व याही निवडणुकीत कायम राहले आहे. भातकुली मध्ये शिवसेनेने 3 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजप 2 जागा तर काँग्रेसने 1 जागेवर तर अपक्ष 2 जागांवर विजयी झाले.

Last Updated : Jan 19, 2022, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.