ETV Bharat / state

मुस्लीम समाजातील मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव - muslim girl wedding invitation card amravati

कुणी मेहंदी काढताना दिसत आहे, तर कुणी नववधूसोबत गप्पा मारताना दिसतात. आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेतून धर्मनिरपेक्षता व समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका ही पूर्णपणे मराठी भाषेत छापली आहे. यामध्ये विवाह स्थळ, विवाह दिनांक आदी मजकूर पूर्णपणे मराठी भाषेत आहे.

मुस्लिम समाजातील मुलीची लग्नपत्रिका व्हायरल
author img

By

Published : Nov 6, 2019, 1:46 PM IST

Updated : Nov 6, 2019, 6:30 PM IST

अमरावती - एखाद्या मुस्लीम समाजातील मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची पत्रिका हिंदी, इंग्रजी किंवा मग उर्दू अशा भाषेत वाचली असेल. मात्र, अमरावतीच्या वलगाव गावातील मुस्लीम समाजातील तरुणीच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही लग्न पत्रिका वाचणाऱ्या नेटकऱ्यांनी नववधू व तिच्या कुटुंबाचे कौतुक केले आहे.

मुस्लीम समाजातील मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव

अमरावतीच्या वलगाव येथील कुरेशी परिवारात सोनू सबा कुरेशी या तरुणीच्या लग्नाची धामधुम सुरू आहे. कुणी मेहंदी काढताना दिसत आहे, तर कुणी नववधूसोबत गप्पा मारताना दिसतात. आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेतून धर्मनिरपेक्षता व समाजाला एकतेचा संदेश देण्यासाठी त्यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका ही पूर्णपणे मराठी भाषेत छापली आहे. यामध्ये विवाह स्थळ, विवाह दिनांक आदी मजकूर पूर्णपणे मराठी भाषेत आहे. लग्नासाठी लागणाऱ्या १ हजार पत्रिका पूर्णपणे मराठीमध्ये आहे. हिंदू-मुस्लीम एक असल्याचा संदेश या माध्यमातून द्यायचे असल्याचे नववधुच्या बहिणीने सांगितले आहे.

हिंदू धर्मात लग्न पत्रिकेत कुटुंबातील सर्वच सदस्यांची नावे टाकली जातात. मात्र, या पत्रिकेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुटुंबातील कुठल्याही सद्स्यांचे नाव न टाकता आमचे प्रेरणा स्थान व छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ छापले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबतीला असलेल्या मुस्लीम बांधवांची नावे आहेत. सध्या ही पत्रिका समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कुरेशी कुटुंबाने लग्न पत्रिकेतून दिलेल्या सामाजिक एकतेच्या संदेशाचे कौतुक केले जात आहे.

अमरावतीच्या कुरेशी कुटुंबाने सर्वधर्म समभाव व एकता कायम राहण्यासाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने अशा प्रकारे एकतेचा संदेश दिल्यास जातीभेद, धर्मभेद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

Intro:स्पेशल स्टोरी करावी ,पॅकेज स्टोरी

अमरावतीच्या "त्या" मुस्लिम मुलीची लग्न पत्रिका तुफान व्हायरल.

पत्रिका वाचून तुम्हीही व्हाल थक्क..
----------------------------------------------------------------
अमरावती अँकर

एखाद्या मुस्लिम मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाची पत्रिका आता पर्यंत्त तुम्ही हिंदी, इंग्रजी ,किंवा मग उर्दू अश्या भाषेत वाचली असेल. परंतु अमरावतीच्या वलगाव गावातील एका मुस्लिम तरुणीच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडिया वर तुफान व्हायरल झालेली आहे.ही लग्न पत्रिका वाचणाऱ्या नेटकर्यांनी नववधू व तिच्या कुटुंबाचे कौतुक केले आहे. तुफान व्हायरल होणारी ही लग्न पत्रिका नेमकी आहे तरी कशी पाहूया या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून.

Vo- 1
अमरावतीच्या वलगाव येथील कुरेशी परिवारात सोनू सबा कुरेशी या तरुणीच्या लग्नाची धामधुम सुरू आहे.कुणी मेहंदी काढतय तर कुणी नववधू सोबत गप्पा मारतय तर कुणी नववधू व तीच्या कुटूंबाला पत्रिका लिहिण्यासाठी मदत करताना आपल्याला दिसतात.आता पर्यत आपन मुस्लिम समाजातील तरुण तरुणींच्या लग्नाच्या पत्रिका या वाचल्या असतील .पन त्या पत्रिका या हिंदी,इंग्रजी, उर्दू सारख्या भाषेत असतात.परंतू आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेतून धर्मनिरपेक्षता व समाज एकता ,भाईचारा कायम राहन्याचा संदेश पोहचावा म्हणून त्यांनी मुलीच्या लग्नाची पत्रिका ही पूर्ण पणे मराठी भाषेत छापली आहे.

बाईट-1-अनिस अहेमद मिर्जा

Vo- 2
या लग्न पत्रिकेत छापून आलेला प्रत्येक शब्द हा पूर्ण पणे मराठी मध्ये आहे.ज्यात विवाह स्थळ,विवाह दिनांक आदी पूर्ण मजकूर हा मराठी भाषेत आहे.लग्नासाठी लागणाऱ्या एक हजार पत्रिका या पुर्ण मराठी मध्ये असून..हिंदू मुसलमान हे एकच असल्याचा संदेश याच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा असल्याचं नववधुच्या बहीनीने सांगितले.

बाईट-2-

Vo-3
हिंदू धर्मात लग्न पत्रिकेत आपले विनीत मध्ये संपुर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे ही टाकली जाते.परन्तु या पत्रिकेतील वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कुटूंबातिल कुठल्याही सदस्यांचे नाव न टाकता आमचे प्रेरणा स्थान व छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ छापले आहे.ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सोबतीला असलेल्या मुस्लिमांची नावे आहे.सध्या ही पत्रिका समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कुरेशी कुटुंबाने लग्न पत्रिकेतून दिलेल्या सामाजिक एकतेच्या संदेशाचे कौतुक होत आहे..

बाईट-3-सोनू सबा-नववधू

Vo-3

अमरावतीच्या कुरेशी कुटूंबाने सर्वधर्म समभाव व एकता कायम राहण्यासाठी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद असून प्रत्येकाने अशा प्रकारे एकतेचा संदेश दिल्यास जातिभेद, धर्मभेद नष्ट व्हायला वेळ लागणार नाही ..

स्वप्निल उमप
Etv भारत अमरावती
Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 6, 2019, 6:30 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.