ETV Bharat / state

मुस्लीम पित्याने आपल्या मुलीच्या लग्नपत्रिकेत दिली छत्रपती शिवाजी महाराज अन् टिपू सुलतान यांच्याविषयी माहिती

'आमच्या येथे ईश्वर कृपेने व आमचे गुरू श्री. जमीलउल्ला शाहा बाबा यांच्या आशीर्वादाने मंगल कार्य करण्याचे योजिले आहे...', हा मजकूर आहे विवाहपत्रिकेतील आणि तोही दोन मुस्लीम बहिणींच्या पत्रिकेतील. या दोन्ही बहिणींचा विवाह आज वलगाव येथे होतो आहे. विशेष म्हणजे, या विवाह पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची अनुक्रमे मुस्लीम आणि हिंदू धार्मिक स्थळांबद्दल दाखविलेल्या उदारतेविषयी माहिती नमूद आहे.

author img

By

Published : Oct 30, 2022, 8:54 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

अमरावती - वलगाव येथील 'हिंदू मुस्लीम कौमी एकता मंच' चे कार्यकर्ते अनिसभाई अहेमद मिर्झा यांच्या सायमा नाज व अदिबा सानिया या दोन मुली आहेत. त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोन्ही शूरवीर राजांच्या धार्मिक दृष्टिकोनाबाबतची माहिती दिली आहे. समाजबांधवांना कळावी, या अनुषंगाने ही पत्रिका तयार करण्यात आली आहे.

लग्नपत्रिका
लग्नपत्रिका

ही पत्रिका वैचारिक प्रगल्भतेची साक्ष - टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन दान दिली, तर काशीच्या मंदिरात १० हजार सोन्याचे शिक्के दान दिले होते. त्याचप्रमाणे गुरू याकूब शाहा यांच्या दर्ग्यासाठी शिवाजी महाराजांनी १०० एकर जमीन दान दिली होती. तसेच, रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरासोबतच मशीदही बांधली असल्याचे त्या पत्रिकेत नमूद आहे. सध्याच्या काळात धार्मिक तेढ वाढले असताना, या दोन धर्मातील अंतर कमी व्हावे, यासाठी अनिस भाईंची ही कृती म्हणजे त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची साक्षच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.